Elon Musk Girlfriend: एलन मस्कच्या गर्लफ्रेंडला मंगळावर जाऊन मरायचेय; व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 12:08 PM2021-04-01T12:08:27+5:302021-04-01T12:10:22+5:30

Elon Musk's girlfriend Grime: एलन मस्क यांच्या गर्लफ्रेंडचे खरे नाव हे क्लॅरी इलीस बाऊचर (Claire Elise Boucher) असे आहे. मात्र तिला ग्रिम्स नावाने हाक मारली जाते. ती पेशाने गायिका आहे.

Elon Musk's girlfriend Grimes says she is 'ready to die on Mars' | Elon Musk Girlfriend: एलन मस्कच्या गर्लफ्रेंडला मंगळावर जाऊन मरायचेय; व्यक्त केली इच्छा

Elon Musk Girlfriend: एलन मस्कच्या गर्लफ्रेंडला मंगळावर जाऊन मरायचेय; व्यक्त केली इच्छा

googlenewsNext

वॉशिंगटन: जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकाला गवसणी घालून आलेले टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्कच्या गर्लफ्रेंडला मंगळावर जाऊन मरायचे आहे. एलन मस्क यांच्याप्रमाणेच तिलाही मंगळावर जाऊ रहायचे आहे. ग्रिम्सचे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा मस्क हे मंगळावर जाण्यासाठी आपल्या स्टारशिप रॉकेटचे सतत परिक्षण करत आहेत. (Elon Musk’s girlfriend Grimes took to Instagram on Tuesday, expressing her extraterrestrial interests amid her beau's ongoing efforts to enable travel to Mars.)


एलन मस्क यांच्या गर्लफ्रेंडचे खरे नाव हे क्लॅरी इलीस बाऊचर (Claire Elise Boucher) असे आहे. मात्र तिला ग्रिम्स नावाने हाक मारली जाते. तिने इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मंगळ ग्रहाच्या लाल मातीवर मरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या आधी तिने एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते की, वयाच्या 50 व्या वर्षी तिला मंगळावर राहण्यासाठी जायचे आहे. या लाल ग्रहावर मानवी वस्ती वसविण्यासाठी मदत केली जाऊ शकेल. एलन मस्क यांना तिसऱ्या महायुद्धापूर्वी मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायची आहे. (Elon Musk's girlfriend Grimes says she is 'ready to die on Mars' in new Instagram post)


स्टारशिप SN11 लाँच करण्याआधी काही मिनिटे आधीच क्रॅश...
मस्क यांच्या मंगळावर जाण्याच्या स्वप्नांना दोनदा सुरुंग लागला आहे. त्यांची कंपनी SpaceX चे रॉकेट स्टारशिप SN11 ने टेक्सास येथून मंगळवारी सकाळीच उड्डाण केले मात्र लँडिंग करताना त्यामध्ये स्फोट झाला. त्या आधी त्यांचे SN10 रॉकेट लँड झाले परंतू त्यानंतर काही वेळातच ते क्रॅश झाले.


रॉकेट जागेवरच फुटले तरीही स्पेसएक्सने याला खूप चांगली टेस्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच संपूर्ण स्टारशिपच्या टीमचे अभिनंदन केले आहे. एलन मस्क हे टेस्ला कार कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी संपूर्ण इलेक्ट्रीक कार बनविते. अमेरिकेत या इलेक्ट्रीक कारची जोरदार चलती आहे. या घटनेनंतर मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, ''मंगळ ग्रह, आम्ही येत आहोत''. मात्र, नंतर त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. रॉकेटने काही यशस्वी चाचण्या केल्या आहेत. स्टारशिप रॉकेटने टेकऑफ केले आणि उड्डाणावेळी आपली स्थितीदेखील बदलली. मात्र, लँडिंगवेळी काही समस्या आली, असे ते म्हणाले. 

Web Title: Elon Musk's girlfriend Grimes says she is 'ready to die on Mars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.