ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन
By admin | Published: March 7, 2016 09:11 AM2016-03-07T09:11:04+5:302016-03-07T19:09:47+5:30
ईमेलचा शोध लावणारे अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला
Next
>
न्यू यॉर्क: आज जगात खासगी अथवा व्यावसायिक संदेशवहनासाठी सर्रासपणो वापरल्या जाणा:या ‘ई-मेल’ची 57 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
लिंकन, मॅसॅच्युसेट्स येथील राहत्या घरी रे टॉमलिन्सन यांचे शुक्रवारी, बहुधा हृदयविकाराने, निधन झाले असावे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिले. त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. रेमण्ड सध्या जेथे नोकरीस होते त्या रेथेऑन कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
आजच्या स्वरूपातील ई-मेलची मुहूर्तमेढ रेमण्ड टॉमलिन्सन यांनी 1971 मध्ये रोवण्यापूर्वीही संगणकांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक संदेशांची देवाणघेवाण करण्याचे अगदी प्राथमिक स्वरूपातील तंत्र अस्तित्वात होते. त्ंयावेळी व्यक्तिगत संगणक नव्हते. त्यामुळे एका मर्यादित नेटवर्कमध्ये अनेकांना सामायिक स्वरूपाचा संदेश पाठविणो शक्य होत असे. रेमण्ड यांनी हे तंत्र आणखी प्रगत केले व जगाच्या पाठीवरील कोटय़वधी लोकांना पूर्णपणो गोपनीय पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर संदेशाची देवाणघेवाण करणो शक्य झाले.
त्यावेळी रेमण्ड बोल्ट, बेरानेक अॅण्ड न्यूमन या आताच्या रेथेऑन कंपनीच्या पूर्वाश्रमीच्या कंपनीत काम करीत होते. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या सहका:यांनी आताच्या इंटरनेटची ‘अर्पानेट’ ही प्राथमिक, ढोबळ आवृत्ती विकसित केली होती. त्या नवख्या तंत्रचे काहीतरी अभिनव प्रयोग करण्याच्या हेतूने रेमण्ड यांनी शेजारी-शेजारी ठेवलेल्या परंतु स्वतंत्र सव्र्हरना जोडलेल्या दोन संगणकांवरून काही चाचणी संदेशांची देवाणघेवाण केली. हे संदेशवहन यशस्वी झाले. परंतु हा कंपनीने नेमून दिलेल्या कामाचा भाग नव्हता त्यामुळे रेमण्ड यांनी काही दिवस याची वाच्यताही केली नव्हती. त्यावेळी कोणते संदेश पाठविले हे आठवतही नाही. कारण ठरवून कोणताही अर्थपूर्ण संदेश तयार केलेला नव्हता. किबोर्डवरच्या काही की मी त्यावेळी स्वैरपणो दाबल्या होत्या. ते संदेश स्मरणात ठेवण्यासाठी नव्हते. त्यामुळे ते आता मी विसरूनही गेलो आहे, असे रेमण्ड यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन 2012 मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले.
@ ची देणगी
प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये ‘’ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते.