विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By Admin | Published: November 4, 2014 04:42 AM2014-11-04T04:42:12+5:302014-11-04T04:42:12+5:30

विमान म्यानमारवर उडत असताना त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे या विमान कंपनीने सांगितले.

Emergency landing of the plane | विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

googlenewsNext

बँकाक : १२९ प्रवाशांना घेऊन नवी दिल्लीहून क्वालालम्पूरला जाणारे मलेशियातील मलिंडो कंपनीचे विमान तांत्रिक समस्येमुळे थायलंडच्या डोन म्युइन्ग विमानतळावर सोमवारी आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. विमान म्यानमारवर उडत असताना त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे या विमान कंपनीने सांगितले.
फ्लाईट ओडी २०६ मध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याचे एका कर्मचाऱ्यास आढळून आले. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षांना याची माहिती देण्यात येऊन विमान डोन म्युइंग विमानतळाकडे वळविण्यात आले, अशी माहिती या कंपनीने दिली. या विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी रात्री दहा वाजून ०५ मिनिटांनी क्लालालम्पूरसाठी उड्डाण घेतले होते. तीन नवजात बालके, आठ कर्मचाऱ्यांसह १२१ प्रवासी असलेल्या हे विमान क्वालालम्पूर येथे आज सकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी उतरणार होते. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Emergency landing of the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.