मोबाइलमधून ‘इर्मजन्सी जासुसी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:28 PM2020-03-28T16:28:18+5:302020-03-28T16:29:00+5:30

आपण आत्ता कुठे आहोत, काय करतोय आणि आगदी आपण काय बोलतोय, याचीही इत्यंभूत माहिती आपल्या मोबाइलच्या माध्यमातून जगजाहीर होत असताना याच मोबाइलचा वापर आता कोरोना रोखण्यासाठी केला जाणार आहे. 

'Emergency spying' from mobile! | मोबाइलमधून ‘इर्मजन्सी जासुसी’!

मोबाइलमधून ‘इर्मजन्सी जासुसी’!

googlenewsNext
ठळक मुद्देही ‘इर्मजन्सी जासुसी’ खरंच कोरोनाला अटकाव करेल की आणखी काही, ते लवकरच कळेल.

लोकमत-

 

 

आपण आत्ता कुठे आहोत, काय करतोय आणि आगदी आपण काय बोलतोय, याचीही इत्यंभूत माहिती आपल्या मोबाइलच्या माध्यमातून जगजाहीर होत असताना याच मोबाइलचा वापर आता कोरोना रोखण्यासाठी केला जाणार आहे. मोबाइल लोकेशनचा वापर करून त्या माहितीचा वापर कोरोना रोखण्यासाठी कसा करता येईल याचे जागतिक पातळीवर प्रय} सुरू झाले आहेत.
इस्त्रायलनं तर यापुढे जाऊन तसा कायदाही केला आहे. 
मोबाइलच्या लोकेशनवरून आपण कुठे आहोत, हे मोबाइल कंपन्यांना कळेल. ही माहिती ते आरोग्य कर्मचार्‍यांना देतील. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित किंवा संशयित असेल, तर आपोआपच तिच्या हालचाली कळतील. ती व्यक्ती कुठे गेली होती, कोणाच्या संपर्कात आली होती हे कळेल. त्या व्यक्तीवर नजर तर ठेवता येईलच, पण तिच्या संपर्कातील लोकांनाही लगेच सावध केलं जाईल. सगळ्यांना मेसेजेस पाठवले जातील. इतकंच नव्हे, ती व्यक्ती नियमांचं पालन करते आहे, की नाही, यावरही ‘पाळत’ ठेवली जाईल! 
आताच्या बिकट, आणिबाणीच्या परिस्थितीत हा पर्याय अत्यावश्यक असल्याचं इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं म्हणणं आहे, तर संशयितांना शोधून काढण्यासाठी आणि कोरोनाबाधितांवर नजर ठेवण्यासाठी चीननं याच मार्गाचा उपयोग केल्याचं म्हटलं जातंय. चीनमधील ‘वी चॅट’ हे मेसेजिंग अँप तयार करणार्‍या कंपनीनं क्यूआर कोडवर आधारित एक ट्रॅकिंग फिचरही तयार केलं आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली, तर लगेच हे अँप त्याला सांगतं, ‘तुला आता उपचारांची आणि क्वॉरण्टाइन होण्याची गरज आहे. ही ‘इर्मजन्सी जासुसी’ खरंच कोरोनाला अटकाव करेल की आणखी काही, ते लवकरच कळेल.

Web Title: 'Emergency spying' from mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.