Emotional Story: अश्रूंची झाली फुले : 33 वर्षांपूर्वी २००० किमी लांब विकलेले, आज आईला भेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:28 AM2022-01-04T06:28:15+5:302022-01-04T06:29:26+5:30

बालतस्करीसाठी झाले हाेते अपहरण; २ हजार किलाेमीटर लांब विकले हाेते

Emotional Story: Man abducted as a child 33 years ago reunited with mother | Emotional Story: अश्रूंची झाली फुले : 33 वर्षांपूर्वी २००० किमी लांब विकलेले, आज आईला भेटला

Emotional Story: अश्रूंची झाली फुले : 33 वर्षांपूर्वी २००० किमी लांब विकलेले, आज आईला भेटला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : बालपणी अपहरण करून विकण्यात आलेल्या चीनमधील एका तरुणाची तब्बल ३३ वर्षांनी आईसाेबत भेट झाली. भेटण्याची पूर्ण आशाच साेडलेल्या या मायलेकांची भेट झाल्यानंतर दाेघांनाही अश्रू आवरत नव्हते. हा प्रसंग पाहून जवळ असलेल्या सर्वांनाच गहिवरून आले. 

चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या ली जिंगवेई याचे १९८९ मध्ये अपहरण झाले हाेते. त्याला जवळपास २ हजार किलाेमीटर लांब गुआंगडाेंग प्रांतात एका दाम्पत्याला विकण्यात आले हाेते. 

आईवडिलांनी त्याचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र, ताे कुठेही सापडला नाही. आता ३३ वर्षांनी ताे आईला भेटायला आला. 
जिंगवेईने स्वत:च घराचा एक नकाशा बनविला हाेता. त्याच्या आधारे ताे घरी पाेहाेचला. त्याला पाहून आईला भेटला तेव्हा दाेघांच्या डाेळ्यातून आनंदाश्रू थांबत नव्हते. जिंगवेईचे लग्न झाले असून त्याला मुलेही आहेत. त्याचे कुटुंब पाहून त्याची आई खूप आनंदी आहे. 

असा झाला भेटीचा प्रवास...
जिंगवेईचे अपहरण झाल्यानंतर एवढे वर्ष उलटून गेले तरीही ताे आईला विसरला नव्हता. आई आणि गावातल्या आठवणी त्याच्या मनात कायम हाेत्या. त्याला ज्यांनी खरेदी केले त्या दाम्पत्यालाही त्याने गावी जाऊ देण्याची विनंती केली हाेती. मात्र, त्यांनी नकार दिला.
अनेक वर्षांनी त्याने मेंदूला ताण देऊन गावाचा एक नकाशा बनवला. ताे साेशल मीडियावर अपलाेड केला. साेबतच त्याने स्वत:चे अपहरण आणि विक्रीचीही गाेष्ट टाकली. जिंगवेईची गाेष्ट व्हायरल झाली आणि प्रकरण पाेलिसांपर्यंत पाेहाेचले. पाेलिसांनीही त्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्याचा निर्धार केला. त्याच्या गावाचा शाेध घेतला. डीएनए चाचणीची मदत घेऊन आईचीही ओळख पटविली. अखेर ३३ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मायलेकांची भेट घडवून आणली.

Web Title: Emotional Story: Man abducted as a child 33 years ago reunited with mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन