अल-कायदाच्या प्रमुख नेत्याचा खात्मा

By admin | Published: December 6, 2014 11:44 PM2014-12-06T23:44:22+5:302014-12-06T23:44:22+5:30

पाकिस्तानी लष्कराने अशांत कबिलाई भागात केलेल्या कारवाईत अल-कायदाच्या जागतिक मोहिमांचा प्रमुख अदनान शुक्रीजुमा याचा खात्मा झाला.

The end of the al-Qaeda chief leader | अल-कायदाच्या प्रमुख नेत्याचा खात्मा

अल-कायदाच्या प्रमुख नेत्याचा खात्मा

Next
पेशावर : पाकिस्तानी लष्कराने अशांत कबिलाई भागात केलेल्या कारवाईत अल-कायदाच्या जागतिक मोहिमांचा प्रमुख अदनान शुक्रीजुमा याचा खात्मा झाला. 2क्क्9 मध्ये न्यूयॉर्क भुयारी मार्गावर हल्ल्याचा कट रचल्याबद्दल तो अमेरिकेला हवा होता. त्याला पकडण्यासाठी ओबामा प्रशासनाने 5क् लाख अमेरिकी डॉलरचे बक्षीस ठेवले होते. 
सौदीत जन्मलेला अदनान दक्षिण वजिरिस्तान जिल्ह्यातील शिनवारसाक भागात मारला गेला. लष्कराच्या या कारवाईत त्याचा एक साथीदार आणि स्थानिक सहायकही मारला गेला. चकमकीदरम्यान लष्कराचा एक जवान मृत्युमुखी पडला, तर दुसरा जखमी झाला, अशी माहिती लष्कराने दिली. अल-कायदाच्या प्रमुख नेत्यांत समावेश असलेल्या अदनानकडे जागतिक मोहिमांची जबाबदारी होती. पाकमधील अल-कायदा नेत्यांच्या इशा:यावरून न्यूयॉर्कच्या भुयारी वाहतुकीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी अदनानसह पाच जणांना अमेरिकेत दोषी ठरविण्यात आले आहे. अमेरिकेने खूप आधीच अदनान हा अमेरिकेसाठी धोका असल्याचे सांगून त्याच्या शिरावर 5क् लाख अमेरिकी डॉलरचे बक्षीस ठेवले होते. 
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम बजवा यांनी ट¦ीट केले की, पाक लष्कराच्या दक्षिण वजिरिस्तानातील हल्ल्यात प्रमुख अल-कायदा कमांडर अदनान अल शुक्री अलजुमा व त्याचा एक साथीदार ठार झाला. यावेळी पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
पाकिस्तानी लष्कराच्या दहशतवादविरोधी मोहिमेमुळे अदनान उत्तर वजिरिस्तानातून दक्षिण वजिरिस्तानात पळाला होता, असेही लष्कराने सांगितले. कराचीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आत्मघाती हल्ल्यानंतर गेल्या जूनपासून पाक लष्कराची ही दहशतवादविरोधी मोहीम सुरू असून यात आतार्पयत 1,1क्क् दहशतवादी मारले गेले आहेत. या मोहिमेदरम्यान लष्कराला 1क्क् जवान गमवावे लागले, असे लष्करी सूत्रंनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
4वॉशिंग्टन पोस्टने 2क्क्3 मध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तामध्ये अदनानला जागतिक स्तरावर घातपाती कारवाया घडवून आणू शकणारा भावी अट्टा असे संबोधले होते. 11 सप्टेंबर 2क्11 मध्ये अमेरिकेत झालेले दहशतवादी हल्ले मोहंमद अट्टा याने घडवून आणले होते. 
 
4अदनान याच्या खात्म्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पाकिस्तानी भूमीवरून सर्व दहशतवाद्यांचा बीमोड करण्यात येईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असे ट¦ीट केले. 

 

Web Title: The end of the al-Qaeda chief leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.