‘हाँगकाँगमधील आंदोलनाचा शेवट भयंकर होऊ शकतो’
By admin | Published: October 5, 2014 01:41 AM2014-10-05T01:41:15+5:302014-10-05T01:41:15+5:30
हाँगकाँगमधील निदर्शनांना अवैध संबोधत चीनने या आंदोलनाची अखेर हाहाकारात होऊ शकते, असा इशारा दिला आहे.
Next
>बीजिंग : हाँगकाँगमधील निदर्शनांना अवैध संबोधत चीनने या आंदोलनाची अखेर हाहाकारात होऊ शकते, असा इशारा दिला आहे. लोकशाही व कायद्याचे राज्य या बाबी परस्परावलंबी आहेत. कायद्याचे राज्य नसलेल्या लोकशाहीने केवळ उत्पात माजेल, असे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या पीपल्स डेली या वृत्तपत्रने म्हटले आहे.
लोकशाहीवादी विद्याथ्र्याच्या आंदोलनामुळे हाँगकाँग ठप्प झाले आहे. शेअर बाजार कोसळणो, ट्रॅफिक जाम, पर्यटकांची संख्या रोडावणो, शाळा आणि दुकाने बंद आदी प्रकारांमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.