मतदारांची बोटे छाटणाऱ्यांचा खात्मा
By admin | Published: June 18, 2014 05:28 AM2014-06-18T05:28:09+5:302014-06-18T05:28:09+5:30
अफगाणिस्तानातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांची बोटे छाटणाऱ्या दोन तालिबान दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.
हेरात : अफगाणिस्तानातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांची बोटे छाटणाऱ्या दोन तालिबान दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.
एका मतदाराने दोनदा मतदान करू नये यासाठी मतदान केलेल्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती; परंतु या शाईमुळेच तालिबानच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नागरिकांची ओळख पटली.
तालिबानने मतदान केल्यास याद राखा, अशी धमकी दिली होती. मात्र, अफगाण नागरिकांनी तालिबानला अजिबात न जुमानता मतदान केले होते. यशस्वी मतदानामुळे चिडलेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांनी हेरातमध्ये ११ ज्येष्ठ नागरिकांची शाई लागलेली बोटे छाटली होती. तालिबान कमांडर मुल्ला शीर आगा आणि त्याच्या एका साथीदाराने हे दुष्कृत्य केले होते. पोलिसांनी या दोघांचा चकमकीत खात्मा केला. (वृत्तसंस्था)