वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
By admin | Published: September 12, 2016 07:46 PM2016-09-12T19:46:50+5:302016-09-12T19:46:50+5:30
शिया आणि पाकिस्तान यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. रशिया हा भारताचा जवळचा मित्र आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १२ - रशिया आणि पाकिस्तान यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. रशिया हा भारताचा जवळचा मित्र आहे. यावर्षाच्या अखेरीस दोन्ही देश संयुक्त लष्करी युद्ध सराव करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच असा युद्ध सराव होत आहे. शीतयुध्दाच्या काळात भारत रशियाच्या जवळ होता तर, पाकिस्तानची अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.
संयुक्त युद्ध सरावातून दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढत असल्याचे सुचित होते. दोन्ही देशांचे २०० सैनिक या सरावामध्ये सहभागी होणार आहेत. वरिष्ठ पाकिस्तानी अधिका-याच्या हवाल्याने 'द एक्सप्रेस ट्रीब्युन'ने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचा रशियाकडून अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याचाही विचार आहे.
या युद्ध सरावाला 'फ्रेंडशिप २०१६' असे नाव देण्यात आले आहे. वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर मतभेद निर्माण झाले असून, भारत आणि अमेरिकेची मैत्री अधिक दृढ झाली आहे.
चीन आणि रशिया हे अमेरिकेचे मुख्य स्पर्धक असून, पाकिस्तान आता या दोन्ही देशांबरोबर आपले संबंध अधिक बळकट करण्यावर भर देत आहे.