निर्वासितांच्या वाटेत अडचणींचे अनंत काटे
By admin | Published: October 20, 2015 04:12 AM2015-10-20T04:12:54+5:302015-10-20T04:12:54+5:30
पश्चिम युरोपात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या निर्वासितांसमोर यक्षप्रश्न उभा आहे. हजारो प्रवासी थंडी, धुक्यात बाल्कनमध्ये फसले आहेत. कारण हंगेरीने क्रोएशियानजीकची सीमा
ओपॅटोवॅक : पश्चिम युरोपात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या निर्वासितांसमोर यक्षप्रश्न उभा आहे. हजारो प्रवासी थंडी, धुक्यात बाल्कनमध्ये फसले आहेत. कारण हंगेरीने क्रोएशियानजीकची सीमा बंद केल्यामुळे निर्वासितांना टप्प्याटप्प्याने स्लोवेनियातून प्रवेश दिला जात आहे. दिवसाला २५०० पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्लोवेनियाने स्पष्ट केले आहे.
प्रचंड थंडी आणि धुक्यामुळे निर्वासितांच्या अडचणीत भर पडली आहे. मध्यपूर्व, आफ्रिका, आशियातून स्थलांतर करणारे निर्वासित रस्त्यात अडकले आहेत. शनिवारी ६००० नागरिक क्रोएशियात प्रवेश करणार होते; पण हे नागरिक आता सर्बियात फसले आहेत. सर्बिया- क्रोएशिया सीमेवर तणाव वाढला आहे. क्रोएशियाचे पोलीस निर्वासितांना प्रवेश देत नसल्यामुळे हा तणाव वाढत आहे. स्लोवेनियाचा मार्ग शनिवारी सुरू करण्यात आला. कारण, हंगेरीच्या सरकारने क्रोएशियाची सीमा निर्वासितांसाठी बंद केली. सुरक्षेचे कारण देत हंगेरीने स्पष्ट केले की, निर्वासितांची गर्दी रोखण्यासाठी हे पाउल उचलले आहे. (वृत्तसंस्था)
.......
स्वीसमध्ये निर्वासितांच्या
विरोधातील पक्षाला यश
जिनिव्हा : निर्वासितांच्या विरोधात कडक भूमिका घेणाऱ्या स्वीसमधील स्वीस पीपल्स पार्टीला संसदीय मतदानात २०० पैकी ६५ जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी त्यांच्या ५४ जागा होत्या. जिनिव्हा विश्वविद्यालयातील राजकीय विश्लेषक पास्कल शायरिनी यांनी सांंगितले की, हे निकाल म्हणजे स्वीसच्या राजकारणातील बदलाचे संकेत आहेत.
.....