मीडियावाले जनतेचे शत्रू
By admin | Published: February 19, 2017 02:17 AM2017-02-19T02:17:04+5:302017-02-19T02:17:04+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांवर जोरदार हल्ला चढविला असून, मीडियावाले अमेरिकी जनतेचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप केला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांवर जोरदार हल्ला चढविला असून, मीडियावाले अमेरिकी जनतेचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप केला आहे.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर जोरदार टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा हल्ला चढविला आहे.
त्यांनी अमेरिकेतील पाच प्रमुख
माध्यम कंपन्यांना लक्ष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्स, एनबीसी न्यूज, एबीसी, सीबीएस, सीएनएन यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्यांची
थेट नावे घेऊन ट्रम्प यांनी हल्ला चढविला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘फेक (खोटारडा) न्यूज मीडिया (एनवायटाइम्स, एनबीसी न्यूज, एबीसी, सीबीएस आणि सीएनएन) माझा शत्रू नाही, हा मीडिया अमेरिकी जनतेचा शत्रू आहे.’ (वृत्तसंस्था)
ट्रम्प यांचे टिष्ट्वट लगेच व्हायरल
- अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून अशा प्रकारे प्रसारमाध्यमांवर कठोर टीका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांचे ट्विट लगेच व्हायरल झाले.
- अवघ्या काही तासांत ते २८ हजार वेळा रिट्विट केले गेले. ५३ हजार वेळा फॉरवर्ड केले गेले, तसेच त्याला ८५ हजार लाइक मिळाल्या.
- अन्य एका ट्विटमध्ये ट्रम्प यांनी पत्रकार परिषद यशस्वी झाल्याचा दावा केला.
फॉक्स न्यूजने एक जनमत चाचणी करून निष्कर्ष जाहीर केले. त्यात मीडियापेक्षा व्हाईट हाऊस अमेरिकी नागरिकांना अधिक विश्वासार्ह वाटत असल्याचे आढळून आले.