शेतकरी आंदोलनाचे लोण इंग्लंडपर्यंत; क्रिकेटपटूने दिला मोदी सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 03:49 PM2020-12-08T15:49:39+5:302020-12-08T15:57:55+5:30
Farmers Protest in England: आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन कृषी कायद्यांविरोधात ठिणगी पडली होती. त्याची आग दिल्लीपर्यंत येईल याची केंद्र सरकारलाही कल्पना नव्हती. मात्र, आता या आंदोलनाचे लोण दिल्लीपर्यंतच न राहता आता इंग्लंडमध्येही पोहोचले आहेत. इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीयांनी निदर्शने केल्याचा व्हिडीओ इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसरने ट्विट कर मोदी सरकारला इशारा दिला आहे.
Time to revert your decision @narendramodi Singhs will keep coming at you, until you make the amendments @sikhchannel@PTC_Network@harbhajan_singh@YUVSTRONG12@akaalchannel@KTVU@BritAsiaTV@PTC_Network @ZeePunjab @BBCNews@SkyNews@panjabradio_@MailOnline#FarmersWithModipic.twitter.com/bAcXxAmydY
— Monty Panesar (@MontyPanesar) December 7, 2020
पनेसरने ट्विटरवर हा व्हिडीओ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून पोस्ट केला आहे. ''तुम्ही घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आली आहे. सिंग (शिख) तुमच्याकडे येत आहेत, जोपर्यंच तुम्ही निर्णय बदलत नाहीत तोवर''. सोबतच माँटीने भारताचे माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनाही टॅग केले आहे.
Fateh The victorious one; Victory, Victory,Victory #FarmLaws#FarmersProtestDelhi2020#KissanEktaJindabad#LondonKisaanRally#FarmerProtestHijacked#KissanVirodhiBJPpic.twitter.com/2HfwWR8N5R
— Monty Panesar (@MontyPanesar) December 7, 2020
पनेसरने या आधीही शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे व्हिडीओ शेअर केले होते.
शेतकऱ्यांना हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर गर्दी होत असून कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आंदोलकांना हटविण्यात यावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंदोलनादरम्यान ८ शेतकऱ्यांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्याला हॉर्ट अटॅक आला होता. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. दुसरीकडे, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.