इंग्लंड युरोपियन युनियनमध्येच रहाणार, एक्झिट पोलचा अंदाज
By admin | Published: June 24, 2016 02:56 AM2016-06-24T02:56:40+5:302016-06-24T03:19:30+5:30
युरोपियन युनियनचे सदस्य बनून रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी इंग्लंडमध्ये मतदान झाल्यानंतर यू गव्हने लगेचच सर्वेक्षणाची नवी आकडेवारी जाहीर केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - युरोपियन युनियनचे सदस्य बनून रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी इंग्लंडमध्ये मतदान झाल्यानंतर यू गव्हने लगेचच सर्वेक्षणाची नवी आकडेवारी जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये 'लिव्ह' आणि 'रिमेन' अशा दोन बाजू असून, रिमेनच्या बाजूला यू गव्हने चार टक्क्यांची आघाडी दाखवली आहे.
रिमेनच्या बाजूने ५२ तर, लिव्हच्या बाजूने ४८ टक्के मतदारांनी कौल दिल्याचा यू गव्हने म्हटले आहे. रिमेनचे नेतृत्व स्वत:हा पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन करत आहेत. हा अंदाज बरोबर ठरला तर, इंग्लंड युरोपियन युनियनमध्ये कायम राहील.
आणखी वाचा
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी २०१५ च्या निवडणुकीवेळी आपण निवडणूक जिंकल्यास युरोपीयन संघाबाबत जनमत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज जनमत घेण्यात आले. इंग्लंडमध्ये बरोजगारी वाढली असून, निर्वासित, स्थलांतरिताचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याविषयी कौल घेण्यात आला.
Thank you everyone who voted to keep Britain stronger, safer & better off in Europe - and thousands of @StrongerIn campaigners around the UK
— David Cameron (@David_Cameron) June 23, 2016