इंग्लंड युरोपियन युनियनमध्ये रहाणार की, बाहेर पडणार, आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 07:45 AM2016-06-23T07:45:06+5:302016-06-23T07:56:41+5:30

ब्रेक्झिट म्हणजेच युरोपियन महासंघात रहायचे कि, बाहेर पडायचे यावर आज इंग्लंडमध्ये मतदान होणार आहे.

England will be in the European Union, that will go out, vote today | इंग्लंड युरोपियन युनियनमध्ये रहाणार की, बाहेर पडणार, आज मतदान

इंग्लंड युरोपियन युनियनमध्ये रहाणार की, बाहेर पडणार, आज मतदान

Next

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २३ - ब्रेक्झिट म्हणजेच युरोपियन महासंघात रहायचे कि, बाहेर पडायचे यावर आज इंग्लंडमध्ये मतदान होणार आहे. इंग्लंडमध्ये होणा-या या मतदानावर फक्त युरोपचेच नव्हे तर, संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण इंग्लंडची जनता जो निर्णय घेणार त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटणार आहेत. 
 
युरोपियन युनियनमध्ये रहाण्यावरुन इंग्लंडमध्ये दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. एकमतप्रवाह युरोपियन युनियनमध्ये कायम रहावे या बाजूचा आहे तर, दुसरा मतप्रवासह युरोपियन युनियनमध्ये रहाण्याच्या विरोधात आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी येईल असे त्यांचे मत आहे. 
 
युरोपियन महासंघावर 'ब्रेक्झिट’ची काळी छाया  (वाचा)
 
युरोपियन युनियनच्या सदस्यत्वामुळे ब्रिटनमधील कंपन्यांना युरोपमध्ये मुक्तपणे व्यापार करता येतो. युनियनमधून बाहेर पडल्यास ही सवलत बंद होईल. त्यामुळे बहुतांश कंपन्यांचा ब्रेक्झिटला विरोध आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरु झाल्यानंतर रात्री दहापर्यंत मतदान चालणार आहे. गुरुवारी रात्री मतमोजणी सुरु झाल्यानंतर शुक्रवारसकाळपर्यंत नेमके चित्र स्पष्ट होईल. मतदाना दरम्यान भारतीय शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटू शकतात. 
 
युरोपियन युनियन 
युरोपियन युनियन हा युरोप खंडातील २८ देशांचा राजकीय आणि आर्थिक महासंघ आहे. युरोपियन महासंघाने (ईयु) या एकत्रीकरणातून एक विशाल अशी बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच युरो या एकाच चलनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था देखील बळकट केली.
 
जनमताची वेळ का ?
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी २०१५ च्या निवडणुकीवेळी आपण निवडणूक जिंकल्यास युरोपीयन संघाबाबत जनमत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हुजूर पक्षामधील खासदारांचा या जनमताबाबत दबाव वाढत होता. त्याचा परिपाक २३ तारखेच्या जनमतामध्ये होत आहे.
 
महासंघाचे समर्थक
दुसऱ्या बाजूला युरोपियन महासंघाचे समर्थक महासंघात राहणे किती योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपीयन महासंघ ही इंग्लंडसाठी फार मोठी बाजारपेठ असून यातून दरवर्षी इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेते ९१ कोटी पौंडची भर पडते. महासंघातून बाहेर पडल्यास एवढ्या विशाल बाजारपेठेवर पाणी सोडावे लागण्याची भिती आहे. महासंघातील व्यापारामुळे इंग्लंडमध्ये ३ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.तर इंग्लंडच्या एकूण व्यापारापैकी ४५ टक्के व्यापार हा महासंघातील देशांसोबत होतो. महासंघातून बाहेर पडल्यास इंग्लंडला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. परदेशी गुंतवणूक येण्याचा वेग मंदावेल त्याचा फटका रोजगार निर्मिती, शेअर मार्केट यांच्यावर पडेल. जागतिक बाजारपेठेस मोठा धोका निर्माण होईल असा इशारा बँक ऑफ इंग्लंडने दिला आहे.
 
भारतावर परिणाम
भारत, पाकिस्तान, बांगला देशातील उद्योजकांचा बाहेर पडण्याच्या भूमिकेला पाठिंबा आहे. कारण महासंघातील स्थलांतरितामुळे आशियाई लोकांना येथे नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. महासंघातून बाहेर पडल्यास त्यांच्यावर नियंत्रण येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना इंग्लंडमध्ये आणता येईल अशी आशियाई नागरीकांची आशा आहे.इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्यास त्याचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. युरोपियन महासंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जगभरातील शेअरबाजारांवर त्याचा परिणाम होणार असून भारताला अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
 
महासंघाचे काय
जर इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्या त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. कारण इंग्लंडमधील ब्रे्रक्झीट मागणीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये सुद्धा फ्रेक्झिटच्या मागणीने डोके वर काढले आहे. तसेच आणखी काही देश यातून बाहेर पडण्याच्या किंवा निर्वासिंताना रोखण्याच्या मागणीवर अडले आहे. असे झाले तर हा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या हादरा बसेल. १९३० च्या जागतिक महामंदी सारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

Web Title: England will be in the European Union, that will go out, vote today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.