ब्रेक्झिटबाबत इंग्लंडशी करार न करता तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:24 AM2018-12-15T04:24:52+5:302018-12-15T04:25:19+5:30

युरोपियन कमिशन १९ डिसेंबरला कृती आराखडा प्रसिद्ध करणार

England will not deal with breaks | ब्रेक्झिटबाबत इंग्लंडशी करार न करता तोडगा काढणार

ब्रेक्झिटबाबत इंग्लंडशी करार न करता तोडगा काढणार

Next

ब्रुसेल्स : ब्रेग्झिटसंदर्भात इंग्लंडशी कोणताही करार न करता येत्या मार्चमध्ये तोडगा काढण्याचे युरोपीय समुदायाच्या नेत्यांनी ठरविले आहे. युरोपियन कमिशन १९ डिसेंबरला कृती आराखडा प्रसिद्ध करणार आहे. 

युरोपीय समुदायाच्या २७ सदस्य देशांच्या नेत्यांची एक परिषद ब्रुसेल्समध्ये भरली आहे. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जिन क्लॉड जंकर यांनी सांगितले की, युरोपीय समुदायाकडून नेमके काय हवे, हे इंग्लंडने स्पष्ट करावे. कृती आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत युरोपीय समुदायातील सदस्य देशांची सामूहिक प्रतिक्रिया नेमकी काय असेल, हे आताच सांगता येणार नाही.

ब्रेग्झिटला विरोध करणाऱ्या इंग्लंडमधील खासदारांच्या गळी ते धोरण उतरविण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांचे प्रयत्न सुरू आहेत. युरोपीय समुदायातून बाहेर पडू इच्छिणाºया इंग्लंडशी करावयाच्या कराराचा मसुदा गेल्या महिन्यात चर्चेसाठी खुला करण्यात आला
होता. (वृत्तसंस्था)

Web Title: England will not deal with breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.