इंग्रजी न येणाऱ्यांची मायदेशी रवानगी

By admin | Published: January 19, 2016 02:59 AM2016-01-19T02:59:06+5:302016-01-19T08:26:42+5:30

सरकारच्या एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे असा

The English will not leave the country | इंग्रजी न येणाऱ्यांची मायदेशी रवानगी

इंग्रजी न येणाऱ्यांची मायदेशी रवानगी

Next

लंडन : सरकारच्या एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे असा आदेश सरकारने दिल्याने प्रवासी आणि अन्य व्हिसावर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
द टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जर दोन वर्षांत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नसाल तर तुमच्यावर देशाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. तथापि, इंग्रजी सुधारण्यासाठी सरकार लोकांची काळजी घेतानाही दिसत आहे. बाहेरून येथे आलेल्या नागरिकांंसाठी विशेषत: महिलांसाठी इंग्रजी शिकण्याकरिता सरकारने २० मिलियन पौंडांची तरतूदही केली आहे. ब्रिटनमध्ये जे जोडीदारासह पाच वर्षांच्या व्हिसावर येतात त्यांची इंग्रजीची चाचणी अडीच वर्षांनी घेण्यात येणार आहे. त्यांच्या इंग्रजीत किती सुधारणा झाली याची माहिती यावरून मिळेल.
कॅमेरुन यांनी याबाबत संदेश देताना म्हटले आहे की, जर तुम्ही इंग्रजी शिकण्यात सुधारणा केली नाही, तर या देशात राहण्यासाठी तो एक मोठा अडथळा ठरू शकतो. (वृत्तसंस्था)

Web Title: The English will not leave the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.