ट्विटर विरोधात संपूर्ण गावाची कोर्टात धाव, 'शैतान पुजारी'ला गावकरी वैतागले, नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:39 PM2022-09-17T12:39:45+5:302022-09-17T12:40:59+5:30

गावातील लोकांचं म्हणणं आहे की ट्विटरवर या गावाविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे गावाची प्रतिमा मलीन होत आहे.

entire village took the court stand against twitter being insulted by the false stories netherlands bodegraven reeuwijk villagers | ट्विटर विरोधात संपूर्ण गावाची कोर्टात धाव, 'शैतान पुजारी'ला गावकरी वैतागले, नेमकं प्रकरण काय? वाचा...

ट्विटर विरोधात संपूर्ण गावाची कोर्टात धाव, 'शैतान पुजारी'ला गावकरी वैतागले, नेमकं प्रकरण काय? वाचा...

googlenewsNext

नेदरलँडमधील एका छोट्याशा गावानं सोशल मीडियातील दिग्गज ट्विटरला कोर्टात खेचलं आहे. गावातील लोकांचं म्हणणं आहे की ट्विटरवर या गावाविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे गावाची प्रतिमा मलीन होत आहे. एका व्यक्तीनं ट्विटरवर ट्विट केलं की, या गावात सैतानाची पूजा करणारा पुजारी आहे. जो या गावातील मुलांवर अत्याचार करत असे. या व्यक्तीनं या भयंकर घटना जवळून पाहिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गावाची बदनामी होत आहे असा गावकऱ्यांचा दावा आहे. 

नेदरलँडमधील एका छोट्या गावातील लोकांनी ट्विटरच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. सैतानाच्या पुजार्‍यांशी संबंधित सर्व ट्विट ट्विटरवरून काढून टाकावेत, असं आवाहन गावातील लोकांना करण्यात आलं आहे. 1980 च्या दशकात गावात सैतान पूजेसारख्या अफवा जोरात असल्याचं म्हटलं जातं. Bodegraven-Reuwijk हे नेदरलँड्सच्या मध्यभागी असलेलं सुमारे 35,000 रहिवासी असलेलं गाव आहे. येथे 2020 पासून सोशल मीडियावर या गावाविरोधात अफवा पसरवली जात आहे. तीन लोकांनी त्यांच्या गावाविरुद्ध मुलांकडून क्रूरता आणि खुनाच्या खोट्या कथा पसरवायला सुरुवात केली.

ट्विटरच्या वकिलांनी भाष्य करणं टाळलं
ट्विटरवर अफवा पसरवणार्‍या तीनपैकी एकानं सांगितले की, बोडेग्रेव्हनमधील मुलांवरील अत्याचाराच्या साक्षीच्या बालपणीच्या आठवणी आहेत. या कथांमुळे बोडेग्रेव्हन शहरात प्रचंड अशांतता पसरली आहे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचे फॉलोअर्स त्या गावात येऊ लागले आणि मुलांच्या कबरीला पुष्पहार घालू लागले. कबरीवर संदेश लिहू लागले. त्याचवेळी इतर लोकांनी ट्विटरवर ही अफवा पसरवण्यास सुरुवात केली. ट्विटरचे वकील जेन्स व्हॅन डेन ब्रिंक यांनी शुक्रवारी हेग जिल्हा न्यायालयात सुनावणीपूर्वी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

कोर्टानं याआधीही दिले होते आदेश
गेल्या वर्षी याच कोर्टानं तिघांना त्यांचे सर्व ट्विट, धमक्या आणि कथेशी संबंधित इतर ऑनलाइन सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश दिले आणि त्यांच्यापैकी कोणीही असे पुन्हा करणार नाही याची खात्री देण्यास सांगितलं होतं. कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून बोडेग्रेव्हनबद्दलच्या कथा अजूनही सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत कारण इतरांनी त्यांची कथा सत्य असल्याचं मानण्यास सुरुवात केली आहे.

आरोपी तुरुंगात
डच वृत्तपत्र डी वोल्क्सक्रांटने शुक्रवारी बोडेग्रॅव्हनचे वकील, सिस व्हॅन डी झांडेन यांनी स्पष्ट केलं की जर षड्यंत्रकर्त्यांनी त्यांचं संदेश हटवले नाहीत, तर सहभागी असलेल्या प्लॅटफॉर्मवर कारवाई करणं आवश्यक आहे. जुलैमध्ये त्यांनी ट्विटरला बोडेग्रेव्हन कथेशी संबंधित सर्व संदेश सक्रियपणे शोधण्याची आणि काढून टाकण्याची विनंती केली. ट्विटरने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. बोडेग्रेव्हन कथेमागील लोक सध्या तुरुंगात आहेत, अशी माहिती व्हॅन डी झांडेन यांनी दिली.

Web Title: entire village took the court stand against twitter being insulted by the false stories netherlands bodegraven reeuwijk villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Twitterट्विटर