"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 07:14 PM2021-02-07T19:14:37+5:302021-02-07T19:17:38+5:30
यापूर्वीही ग्रेटानं कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं होतं ट्वीट
हवामान बदलासारख्या विषयांवर काम करणारी ग्रेटा थनबर्ग ही सोशल मीडियावर खुप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ट्वीट करत तिनं समर्थन दिलं होतं. तिच्या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर काही जणांनी तिच्या ट्वीटचा विरोध केला तर काहींनी तिच्या ट्वीटचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या ट्वीटवरून वाद सुरू असतानाच तिनं पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलं गेल्याचं म्हटलं.
"विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण हे दोन्ही बोलण्याचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, तथ्य आणि परदर्शकतेवर आधारित आहे. जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचाही आदर करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचा आदर करू शकणार नाही," असं ट्वीट ग्रेटा थनबर्गनं केलं आहे. यापूर्वी अभिनेते प्रकाश राज यांनी ग्रेटा थनबर्गच्या ट्वीटचं समर्थन केलं होतं. आता त्यांनी तिचं हे नवं ट्वीट लाईकदेखील केलं आहे.
Science and democracy are strongly interlinked - as they are both built on freedom of speech, independence, facts and transparency.
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 6, 2021
If you don’t respect democracy then you probably won’t respect science. And if you don’t respect science then you probably won’t respect democracy.
अमित शाहंनही दुष्प्रचार म्हणत केला होता विरोध
"कोणताही दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उची गाठण्यापासून रोखू शकत नाही, दुष्प्रचार हा भारताचं भवितव्य ठरवू शकत नाही केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल," असं ट्वीट अमित शाह यांनी केलं होतं. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.
कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह
ग्रेटा थनबर्गनेकडून समर्थन
रिहानानंतर आता स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटलं होतं.
रिहानंनंही केलं ट्वीट
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितलं आहे. रिहानाने या बातमीसोबत बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे.