भारताशी मैत्री ही धोरणात्मक अमेरिकेसाठी अनिवार्यता
By Admin | Published: July 30, 2014 01:32 AM2014-07-30T01:32:18+5:302014-07-30T01:32:18+5:30
राजनैतिक संबंध अधिक मजबूत करणो ही धोरणात्मक अनिवार्यता असल्याची कबुली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दिली.
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीसंबंध आता एका ‘संक्रमणाच्या टप्प्यावर’ आल्याचे नमूद करत भारताशी असलेले राजनैतिक संबंध अधिक मजबूत करणो ही धोरणात्मक अनिवार्यता असल्याची कबुली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दिली. केरी हे भारतातील नव्या सरकारसोबत अधिक दृढ संबंध करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय चर्चेसाठी 31 जुलैला भारत दौ:यावर येणार आहेत.
केरी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक घोषणोचे समर्थन करत त्याला ‘विशाल दृष्टिकोन’ असे संबोधले. ‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस’ या अमेरिकी विचारगटातर्फे भारतासोबतच्या परराष्ट्र धोरणाबाबत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘मोदी यांचा हा दृष्टिकोन महान असून आमचे खासगी क्षेत्र भारताच्या आर्थिक पुनर्बाधणीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्यास उत्सुक आहे. आता नवे सरकार, नव्या संधी आणि नव्या शक्यता यांच्यासोबत चर्चा करण्याची वेळ आहे.’
भारतासोबतच्या सहकार्य पर्वात विधायक बदल करण्याची वेळ असून आम्ही धोरणात्मक तथा ऐतिहासिक संधींबाबत आश्वासित आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केरी गुरुवारी दिल्लीत होणा:या परराष्ट्र पातळीवरील पाचव्या भारत-अमेरिका धोरणात्मक चर्चेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या सोबत सह-अध्यक्षत्व स्वीकारतील. भारताच्या नव्या सरकारने परिवर्तन
आणि सुधारणा यासाठी जनमत मिळविले आहे, असेही ते
म्हणाले. (वृत्तसंस्था)
अमेरिकेची पंचसूत्री
आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत
द्विपक्षीय व्यापाराला चालना देणो
दक्षिण आशियामध्ये संपर्क वाढविणो
स्वच्छ ऊर्जानिर्मिती करणो
आशियासह जगभरातील सुरक्षा भागीदारी मजबूत करणो
21व्या शतकातील भागीदार
च्अमेरिका आणि भारत हे 21 व्या शतकातील अनिवार्य भागीदार होऊ शकतात आणि झाले पाहिजेत.
च्मोदी सरकारशी संपर्क आणि संबंध दृढ करण्यामागे आमचा हाच आधार असल्याचे केरी म्हणाले.