महिलेने दोघांवर केला 10 वेळा रेप केल्याचा खोटा आरोप, मग केसमध्ये आला ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 10:34 AM2022-10-03T10:34:07+5:302022-10-03T10:35:58+5:30
एसेक्सला राहणारी 35 वयाची कॅथी रिर्डसन नावाच्या एका महिलेने 2 पुरूषांवर 10 वेळा रेपचा आरोप केला होता.
UK Fake rape case: कधीच खोट्याचा विजय नसतो, कधीना कधी सत्य समोर येतंच. एकदा बोललं गेलेलं खोटं हे नेहमीसाठी खोटंच राहतं. हेही खरं आहे की, वाईटावर नेहमीच चांगल्याच विजय होत असतो. अशीच एक घटना यूकेमधून समोर आली. इथे सतत खोट्याचा खेळ खेळणाऱ्या महिलेला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली.
2 पुरूषांवर 10 वेळा रेप केल्याचा आरोप
एसेक्सला राहणारी 35 वयाची कॅथी रिर्डसन नावाच्या एका महिलेने 2 पुरूषांवर 10 वेळा रेपचा आरोप केला होता. पण नंतर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, हे सगळे आरोप खोटे आहेत. स्थानिक पोलिसांनुसार, महिलेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम अॅक्टिव होत्या. यादरम्यान फॉरेन्सिककडून गोळा करण्यात आलेल्या पुराव्यातून सत्य जाणून घेण्यात आलं.
पुराव्यांनी केली पोलखोल
डेली मेल प्रकाशित रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांना आढळलं की, सीसीटीव्ही, फोन डेटा आणि इतर काही पुराव्यातून समजलं की, कथित आरोपी त्यावेळी तिच्या घराच्या परिसरात दूरदूर पर्यंत कुठेच दिसले नाहीत. तरिही महिला तिच्या आरोपांवर ठाम होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक पोलिसांनी गेल्यावर्षी 28 मे 2021 ला आरोपी महिला रिचर्डसनला अटक करत कोर्टात हजर केलं होतं. आता त्याच खोट्या केसमध्ये महिलेला पाच वर्ष आणि एक महिन्याची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निर्दोष व्यक्तीला वाचवणं हेही आमचं काम आहे. जेव्हाही कोणती रेपची केस येते तेव्हा आमचा फोकस पीडित म्हणजे आरोप करणाऱ्यावर असतो. इतरही गोष्टींकडे नजर असते. कारण रेप असा गुन्हा आहे ज्याचा पीडितेच्या मनावर, मेंदूवर खोलवर प्रभाव पडतो.