कॅनडाच्या शीख संरक्षणमंत्र्यांवर सैनिकाकडून वांशिक टिप्पणी
By admin | Published: November 13, 2015 04:15 PM2015-11-13T16:15:24+5:302015-11-13T16:15:24+5:30
कॅनडाच्या नवनियुक्त शीख संरक्षणमंत्र्यांना एका सैनिकाकडून सोशल मीडियावर वांशिक टिप्पणीला तोंड द्यावे लागले असून सैन्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
टोरांटो, दि. १३ - कॅनडाच्या नवनियुक्त शीख संरक्षणमंत्र्यांना एका सैनिकाकडून सोशल मीडियावर वांशिक टिप्पणीला तोंड द्यावे लागले असून सैन्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजीत सज्जन यांच्याबाबत नेमकं काय लिहिण्यात आलं आणि ते लिहिणा-या सैनिकाचं नाव काय याबाबत सैन्यानं गुप्तता बाळगली आहे. परंतु, सज्जान यांच्या वंशासंदर्भात अनुचित टिप्पणी या सैनिकाने फेसबुकवर फ्रेंचमध्ये केल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त ग्लोब अँड मेलने दिले आहे. ही पोस्ट लगेचच काढण्यात आली आहे.
तरूणपणीच कॅनडामध्ये गेलेल्या सज्जान यांनी अफगाणिस्तान, बोस्नियामध्ये कॅनडाच्या लष्कराची सेवा केली आहे. अशा प्रकारची वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही अशी सूचना सगळ्या सैनिकांना मेलद्वारे या घटनेनंतर देण्यात आली आहे.
वांशिक टीकाटिप्पणी लष्कराच्या वातावरणात अजिबात चालणार नाहीत असे लष्कराने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही अशी तंबीही देण्यात आली आहे.