Ethiopian Crisis: 'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 12:23 PM2022-01-09T12:23:55+5:302022-01-09T12:24:04+5:30

Ethiopian Crisis: 18 ऑक्टोबरपासून आतापर्यंत झालेल्या विविध हल्ल्यात 146 लोक मारले गेले आणि 213 जखमी झाले आहेत.

Ethiopian Crisis: 56 killed, 30 injured in airstrikes on refugee camps | Ethiopian Crisis: 'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

Ethiopian Crisis: 'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

Next

आफ्रिकन देश इथिओपियामध्ये सातत्याने हिंसाचार वाढत आहे. येथील टायग्रे भागातील निर्वासित छावणीवर मध्यरात्री अचानक हवाई हल्ला झाला. ज्यामध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्ती जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या फायटिंग टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) पक्षाचे प्रवक्ते गेटाचेव्ह रेडा यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, पंतप्रधान अबी अहमदच्या सैनिकांनी डेडेबिट येथील विस्थापित लोकांच्या छावणीवर हा ड्रोन हल्ला घडवून आणला.

मिळालेल्या माहितीनुसार, डेडेबिटमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. हा परिसर इरिट्रियन सीमेजवळच्या वायव्येस स्थित आहे. दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते कर्नल गार्नेट अडाणे आणि सरकारचे प्रवक्ते लीगेसी टुलू यांनी या प्रकरणी अद्याप काहीही सांगितलेले नाही. पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने देखील स्थानिक माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. याआधीही सरकारने विद्रोही सैन्याविरुद्ध 14 महिने चाललेल्या संघर्षात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला होता.

लहान मुले आणि वृद्धांच्या कँपवर हल्ला
शुक्रवारी सरकारने अनेक विरोधी नेत्यांची तुरुंगातून सुटका केली आणि समेटासाठी या लोकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांच्या मृत्यूची पुष्टी केली असल्याची माहिती आहे. त्यांनी जखमींची छायाचित्रेही दाखवली. ज्यावरून असे दिसून आले की हल्ल्यात मुले देखील जखमी झाली आहेत. या शिबिरात अनेक लहान मुले व वृद्ध लोकही राहत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसर्‍या मीडिया वेबसाइटने वृत्त दिले की हा हल्ला मध्यरात्री झाला, लोकांना पळून जाण्याची वेळही या हल्ल्याने दिली नाही.

आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू

टायग्रे प्रदेशात हवाई हल्ले काही नवीन नाहीत. 18 ऑक्टोबरपासून आतापर्यंत 146 लोक मारले गेले आणि 213 जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये असे दिसून आले आहे की, टायग्रे प्रदेशातील निर्वासित शिबिरांच्या 400 पेक्षा जास्त संरचनेचे वाईटरित्या नुकसान झाले आहे. हे सर्व हवाई हल्ल्यात घडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे निर्वासित नोव्हेंबर 2020 पासून इथिओपियन सैन्य आणि बंडखोर यांच्यात टायग्रे प्रदेशात संघर्ष सुरू झाल्यापासून या छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यामुळे इथियोपियाच्या सीमेवर चार छावण्या उभारण्यात आल्या, ज्यात 96000 लोक राहतात.

Web Title: Ethiopian Crisis: 56 killed, 30 injured in airstrikes on refugee camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.