गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:50 PM2024-10-10T21:50:45+5:302024-10-10T21:57:20+5:30

Europa Clipper spacecraft : हे अंतराळ यान बनवण्यासाठी 5 अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.

Europa Clipper spacecraft : Search for aliens on Jupiter; NASA launched the mission | गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...

गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...

Europa Clipper spacecraft : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था NASA एकामागून एक मिशन लॉन्च करत आहे. आता नासा गुरू ग्रहावर एलियनचा शोध घेणार आहे. आज, म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी गुरू ग्रहकाचा चौथा सर्वात मोठा चंद्र युरोपासाठी NASA ची नवीन मोहीम सुरू होत आहे. युरोपा क्लिपर नावाचे हे यान गुरुच्या चंद्राचा सविस्तर अभ्यास करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचादेखील शोध घेतला जाईल. युरोपावर जीवसृष्टी शोधणे, हा या युरोपा क्लिपर मिशनचा मुख्य उद्देश आहे. 1610 मध्ये गॅलिलिओ गॅलीलीने या युरोपाचा शोध लावला होता. हा बऱ्याच काळापासून खगोल शास्त्रज्ञांचा आकर्षणाचा विषय आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वीच युरोपाच्या जाड बर्फाळ कवचाखाली एक मोठा महासागर शोधला आहे.

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन हेवी रॉकेटच्या सहाय्याने फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून या यानचा प्रवास सुरू होईल. उड्डाण केल्यानंतर ते प्रथम मंगळाच्या दिशेने जाईल आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनेते आपला वेग वाढवून पृथ्वीच्या दिशेने येईल. यानंतर डिसेंबर 2026 मध्ये पुन्हा एकदा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ते गुरुच्या दिशेने झेप घेईल. युरोपा क्लिपर 11 एप्रिल 2030 पर्यंत गुरू ग्रहावर पोहोचेल. विशेष म्हणझे, हे अंतराळ यान बनवण्यासाठी 5 अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.

शास्त्रज्ञांनी जर्नल ऑफ गाईडन्स, कंट्रोल अँड डायनामिक्समध्ये प्रकाशित केलेल्या पेपरमध्ये म्हटले आहे की, यान 11 एप्रिल 2030 रोजी गुरूच्या जवळ पोहोचेल आणि गुरूच्या लांब वळणावळणाच्या कक्षेत प्रवेश करेल. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील वायुमंडलीय आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेनुसार, ऑर्बिट अॅडजस्ट करण्यासाठी 1 वर्ष लागेल. यान युरोपाभोवती 50 वेळा फिरेल. त्याचबरोबर फ्लायबायच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना चंद्रावरील बर्फ, समुद्राची संभाव्य खोली आणि राहण्याची क्षमता यांचे विश्लेषण करण्याची संधी मिळेल.

Web Title: Europa Clipper spacecraft : Search for aliens on Jupiter; NASA launched the mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.