युरोप : जनजीवन रुळावर येणार, अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:23 AM2021-05-03T06:23:26+5:302021-05-03T06:24:09+5:30
अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या घटली
पॅरिस : युरोपमधील जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काही दिवसात युरोपात हर्ड इम्युनिटी येईल. जर्मनीत नवे रुग्ण वेगाने कमी होत आहेत. फ्रान्समध्ये मेपासून विविध स्तरातील लॉकडाऊन समाप्त करण्यात येणार आहे. स्पेनमधील निर्बंध ९ मेरोजी समाप्त होत आहेत.
ब्रिटनमध्ये दुकाने, रेस्टॉरंट यापूर्वीच सुरू झाली आहेत. बेल्जियममध्ये ८ मेपासून रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ऑस्ट्रियातही सर्व दुकाने १९ मेपासून सुरू होणार आहेत. इस्रायलमध्ये आता मास्क आवश्यक नाही. रेस्टॉरंट, म्युझियम, कॅफे, लायब्ररी मागील आठवड्यातच सुरू झाले आहेत.
ब्राझिलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांवर आहे. फ्रान्समध्ये सक्रिय रुग्ण ९ लाख ४७ हजारांवर आहेत. तुर्कीत ४ लाखांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रशियात सक्रिय रुग्ण २ लाख ६८ हजारांवर आहेत. अमेरिकेतील सक्रिय रुग्णांची संख्या ६७ लाखांवर आहे. स्पेन, जर्मनीतील सक्रिय रुग्ण अनुक्रमे २ लाख ३९ हजार व ३ लाखांवर आहेत. पाकिस्तानात ८९ हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. जपानमधील सक्रिय रुग्णांची संख्या ५९ हजारांवर आहे. युएईतील सक्रिय रुग्ण १७ हजारांवर, तर सौदीतील सक्रिय रुग्ण ९ हजारांवर आहेत. श्रीलंकेतील सक्रिय रुग्ण ११ हजारांवर आहेत.
भारतातून आपल्याच देशात परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना होऊ शकतो तुरुंगवास
nसिडनी : सध्या भारतात असलेले ऑस्ट्रेलियन नागरिक जर आपल्या देशात परतत असतील तर त्यांना दंड लागू शकतो. तसेच, पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. कारण, ऑस्ट्रेलियातील सरकारने भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यासाठी अस्थायी बंदी घातली आहे.
nऑस्ट्रेलियातील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी आणलेली आहे. भारतात जवळपास ९ हजार ऑस्ट्रेलियन नागरिक राहतात. यातील ६०० लोकांना असुरक्षित श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
nऑस्ट्रेलियातील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इतिहासात हे प्रथमच होत आहे की, आपल्याच देशात परतल्यानंतर हा गुन्हा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियातील एक डॉक्टर व्योम शार्मर यांनी म्हटले आहे की, आमचे कुटुंबीय भारतात मृत्युमुखी पडत आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. अशावेळी हा निर्णय घेणे म्हणजे त्यांना संकटात सोडण्यासारखे आहे.
n१४ दिवसांपूर्वी जो कोणी भारतात गेलेला आहे, त्यांना सध्या देशात प्रवेश मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाच वर्षांची शिक्षा अथवा ४८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी म्हटले आहे की, सरकारने हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहे. भारताला व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट पाठविण्याबाबत सहमती झाली आहे.