चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:45 IST2025-01-16T16:41:15+5:302025-01-16T16:45:14+5:30

चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत...

Even a pinch of moon soil is very valuable china lunar samples distributed to institutions worldwide | चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

चीनने चंद्र मोहिमेच्या माध्यमाने गोळा केलेले नमुने आता जग भरात वाटायला सुरुवात केली आहे. 'पीपल्स डेली चायना'नुसार, आतापर्यंत चांग'ई-5 मिशनचे 289 सँपल्स एकूण 47 संस्थांना पाठवण्यात आले आहेत. तर चांग'ई-6 चे 16 लूनर सँपल्स आतापर्यंत 12 संस्थांना वितरित करण्यात आले आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था NASA चीही या नमून्यांवर संशोधन करण्याची इच्छा आहे. ही मातीचे वजन 1 ग्रॅमपेक्षा अधिक नाही. मात्र, विज्ञानाच्या दृष्टीने ही चिमूटभर मातीही अमूल्य आहे.
 
महत्वाचे म्हणजे, चीनने अपल्या संशोधनाचे विश्लेषण पूर्ण केल्यानंतर हे नमुने जगभरातील वैज्ञानिकांसाठी खुले केले आहेत. जर हे नमुने कुणाला हवे असतील, तर ते चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनशी (CNSA) संपर्क साधू शकतात. हे नमुने मोफत दिले जात आहेत.

चीनने चांद्रावरून किती माती आणली? - 
चीनच्या चांग'ई-5 मिशनने डिसेंबर 2020 मध्ये चंद्राजवळील भागातून 1731 ग्रॅम नमूने पृथ्वीवर आणले होते. 47 संस्थानांना एकूण 85.5 ग्रॅमचे नमूने वाटले आहेत. यानंतर, चांग'ई-6 मिशनने जून 2024 मध्ये चंद्राच्या दुसऱ्या भागातून 1,935.3 ग्रॅम नमूने गोळा केले होते. 12 संस्थाना दिलेल्या या नमुन्यांचे एकूण वजन  37.1 ग्रॅम होते.

चीनचे चंद्र मिशन -
चंद्राच्या नमुन्यांच्या अभ्यासावरून, चंद्राची उत्पत्ती, विकास आणि भू-रासायनिक संरचनेसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत. जे चंद्रावरील इतर भागातून गोळा केलेल्या नमुन्यांच्या तुलनेत वेगळे आहे. 

Web Title: Even a pinch of moon soil is very valuable china lunar samples distributed to institutions worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.