या देशात 80 लाख उत्पन्न असणाराही चक्क गरीबचं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:49 PM2018-07-11T15:49:12+5:302018-07-11T15:51:21+5:30
अहो, आमचा मुलगा इंजिनीअर आहे. त्याला महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे. साधारण हे शब्द भारतात ऐकले की ऐकणाऱ्या व्यक्तीच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत
न्यूयॉर्क - अहो, आमचा मुलगा इंजिनीअर आहे. त्याला महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे. साधारण हे शब्द भारतात ऐकले की ऐकणाऱ्या व्यक्तीच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. ज्या व्यक्तीला 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक पगार मिळतो, त्या व्यक्तीस आपल्याकडे यशस्वी मानण्यात येते. तर कुटुंब आणि नातेवाईकांकडूही त्याचे कौतूक होते. मात्र, एक शहर असेही आहे, जेथे 80 लाख रुपये कमाविणारा व्यक्तीही गरीब समजला जातो. सॅन फ्रान्सिस्को असे अमेरिकेतील या शहराचे नाव आहे.
अमेरिकेने ग्रामीण आणि शहरी विकास विभागासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सॅन फ्रान्सिस्को, सॅन मॅटियो आणि त्याच्या जवळपास राहणाऱ्या 4 सदस्यीय कुटुंबाचे उत्पन्न 80 लाख रुपये असल्यास ते कुटुंब गरीब समजण्यात येते. तर 50 लाख रुपये उत्पन्न असलेले कुटुंब अधिकच गरीब असल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आहे. ब्रुकिंग इंस्टीट्यूटची वेबसाइट द हॅमिल्टन प्रोजेक्टच्या एका सर्व्हेक्षणानुसार अमरीकेतील लोकांच्या उत्पन्नामध्ये मोठी तफावत आहे. अमेरिकेतील जवळपास 2/3 लोकांची कमाई 80 लाक रुपये असून हे सर्व कुटुंब गरीब समजले जातात. 32.6 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत 4 कोटींपेक्षा अधिक लोग गरिबीच्या रेषेखाली येतात. 4 सदस्यसंख्या असलेल्या या कुटुंबांचे उत्पन्न जवळपास 17 लाख रुपये आहे. सॅन फ्रान्सिस्को या शहरात आयटी कंपन्या आणि टेक्नॉलॉजी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. अधिक पैसा कमावण्याची इच्छा असणारांसाठी सॅन फ्रान्सिस्को हे ड्रीमसिटी आहे.
सॅन फ्रान्सिस्को शहरात सन 2008 ते 2016 या कालावधीत राहणाऱ्या 25 ते 64 वर्षे वयाच्या नोकरदार लोकांची कमाई 26 टक्क्यांनी वाढली आहे. इतर शहरांच्या तुलनेत ही कमाई अधिक आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डॉक्टरांची कमाई सर्वाधिक आहे. येथील डॉक्टर सर्वसाधारणपणे 1 कोटी 32 रुपयांपेक्षाही अधिक रुपये कमावतात. दरम्यान, या शहरात 2 बीएचके अपार्टमेंटचे भाडे महिना 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.