मंगळ ग्रहावर सापडले जीवनाचे पुरावे
By admin | Published: December 18, 2014 05:02 AM2014-12-18T05:02:48+5:302014-12-18T05:02:48+5:30
नासाचे क्युरिआॅसिटी रोव्हर हे यान मंगळावर जाऊन वर्ष पूर्ण होऊनही जीवनाचे संकेत मानावेत असा पुरावा या यानाला मिळालेला नव्हता;
वॉशिंग्टन : नासाचे क्युरिआॅसिटी रोव्हर हे यान मंगळावर जाऊन वर्ष पूर्ण होऊनही जीवनाचे संकेत मानावेत असा पुरावा या यानाला मिळालेला नव्हता; पण आता मंगळावर आजही सूक्ष्मजीव जिवंत असावेत असे पुरावे मिळाले असून क्युरिआॅसिटी यानाला मिथेनचे भांडार सापडले आहे. मिथेन वायू हे सूक्ष्म जीवांनी निरुपयोगी म्हणून शरीराबाहेर टाकलेले पदार्थ असतात, असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. मंगळावरील जीवनाचे पुरावे शोधताना पुढे जाण्यासाठी हे संकेत आहेत, असे शास्त्रज्ञ जॉन पी. ग्रॉटिन्झर यांनी म्हटले आहे.
मंगळावरील खडकात कार्बनवर आधारित जैविक कणही सापडले आहेत. हे जैविक कण हा जीवनाचा थेट पुरावा नव्हे; पण मंगळावर जीवनाला पोषक असे घटक होते आणि आजही आहेत, असे मानण्यास मात्र जागा आहे, असे ग्रॉटिन्झर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संशोधनाच्या दृष्टीने हा फार मोठा क्षण आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)