उत्क्रांती सिद्धांत हे वैज्ञानिक सत्य

By admin | Published: October 29, 2014 01:30 AM2014-10-29T01:30:57+5:302014-10-29T01:30:57+5:30

पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती उत्क्रांतीमधून झाली आणि विश्वाची निर्मिती महाविस्फोटातून (बिग बँग)झाली हे वैज्ञानिक सिद्धांत सत्य आहेत व

Evolution theory is the scientific truth | उत्क्रांती सिद्धांत हे वैज्ञानिक सत्य

उत्क्रांती सिद्धांत हे वैज्ञानिक सत्य

Next
पोप फ्रान्सिस यांची घोषणा : परमेश्वर हा सृष्टीचा जादुगार नाही
व्हॅटिकन सिटी: पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती उत्क्रांतीमधून झाली आणि  विश्वाची निर्मिती महाविस्फोटातून (बिग बँग)झाली हे वैज्ञानिक सिद्धांत सत्य आहेत व परमेश्वर हा हाती जादुई छडी असलेला कोणी जादुगार नाही, असे जगभरातील रोमन कॅथॉलिक ािश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी जाहीर केले आहे.
पृथ्वी आणि मानवाचा जनक आकाशीचा मायबाप आहे, असे धार्मिक तत्त्वज्ञान ािश्चन धर्मवेत्त्यांनी सुरुवातीपासून रुजविले असून याआधीचे पोप 14 वे बेनेडिक्ट यांनीही त्यास जोरकसपणो खतपाणी घातले होते. परंतु ‘पॉन्टिफिकल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये केलेल्या उपयुक्त भाष्यांनी पोप फ्रान्सिस यांनी या ‘बेगडी सिद्धांतांना’ कायमची मुठमाती दिली, असे तज्झांना वाटते.
मात्र या चराचर सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे हे धार्मिक तत्वज्ञान आणि उत्क्रांती आणि महाविस्फोटाचे वैज्ञानिक सिद्धांत परस्परांना छेद देणारे नसून किंबहूना परस्परांचा सिद्धतेसाठी त्यांची आवश्यकता आहे, असे पोप फ्रान्सिस यांचे म्हणणो होते.
ते म्हणाले की, सृष्टीच्या निर्मितीचे कथानक आपण जेव्हा ‘जेनेसिस’मध्ये वाचतो तेव्हा जादूची कांडी फिरविताच सर्व काही चुटकीसरशी करू शकणारा परमेश्वर हा कोणी किमयागार आहे, असा आपला समज होण्याचा धोका असतो. पण वास्तवात तसे नाही. पोप म्हणाले की, परमेश्वराने मानव घडविला व त्याने आपल्याला जीवनाचे यमनियमही ठरवून दिले जेणो करून त्याचे पालन करून प्रत्येकाला आपल्या पूर्ण क्षमतांनुसार विकास करता यावा.
तसेच या विश्वाची निर्मिती एका महाविस्फोटातून झाली, असे आज मानले जाते. पण हा सिद्धांतही दैवी निर्मि तीच्या कल्पनेच्या विरोधात नाही, उलट त्यानेच वैज्ञानिक सिद्धांतीच प्रचिती येते, अेसही पोप म्हणाले. अधिक स्पष्टिकरण देताना ते म्हणाले की, मुळात निसर्गातील उत्क्रांती निर्मितीच्या मूळ संकल्पनेशी विसंगत नाही, कारण उत्क्रांतीसाठीही जे उत्क्रांत होऊ शकतात अशा जिवांचे जन्माला येणो गरजेचे असते. (वृत्तसंस्था)
 
अवैज्ञानिक परंपरेचा पगडा
 अवैज्ञानिक विचारांना चिकटून राहण्याचा दुराग्रह करण्याची कॅथॉलिक चर्चची कित्येक शतकांची जुनी परांपरा आहे. पृथ्वी हा ग्रहमालेचा केंद्र असून सूर्य हा केंद्रस्थानी आहे व पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे निरीक्षणसिद्ध खगोलीय सत्य मांडणा:या गॅलिलिओचा अनन्वित छळ करून त्याला आपला हा सिद्धांत याच चर्चच्या दुड्डाचार्यानी मागे घ्यायला लावला होता.

 

Web Title: Evolution theory is the scientific truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.