'या'राष्ट्रपतींनी ५३ वर्ष छोट्या गर्लफ्रेंडच्या नावावर केली ९०० कोटींची प्रॉपर्टी; तीनवेळा राहिले होते पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:36 PM2023-07-10T13:36:23+5:302023-07-10T13:36:52+5:30

आपल्या मृत्युपत्रात बर्लुस्कोनीने गर्लफ्रेंड मार्टा फॅसिनासाठी १०० मिलियन युरो म्हणजेच सुमारे ९०० कोटी रुपयांची संपत्ती दिली आहे.

ex italian pm silvio berlusconi leaves 900 crore to 33 year old girlfriend | 'या'राष्ट्रपतींनी ५३ वर्ष छोट्या गर्लफ्रेंडच्या नावावर केली ९०० कोटींची प्रॉपर्टी; तीनवेळा राहिले होते पंतप्रधान

'या'राष्ट्रपतींनी ५३ वर्ष छोट्या गर्लफ्रेंडच्या नावावर केली ९०० कोटींची प्रॉपर्टी; तीनवेळा राहिले होते पंतप्रधान

googlenewsNext

इटलीचे माजी राष्ट्रपती सिल्वियो बर्लुस्कोनी यांनी आपल्या गर्लफ्रेंडसाठी ९०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी दिली आहे. एका अहवालानुसार, बर्लुस्कोनी यांनी १०० मिलियन युरो म्हणजेच सुमारे ९०० कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती त्यांची मैत्रीण मार्टा फॅसिना हिला मृत्यूपत्रात दिली आहे. बर्लुस्कोनी यांचे गेल्या महिन्यात वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. तीन वेळा इटलीचे पंतप्रधान राहिलेल्या बर्लुस्कोनी यांची एकूण संपत्ती ६ अब्ज युरोच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. फॅसिना आणि बर्लुस्कोनी यांचे नाते २०२० मध्ये सुरू झाले. बर्लुस्कोनी आणि फॅसिना हे कायदेशीररित्या विवाहित नव्हते, पण त्यांनी तिला पत्नी म्हणून संबोधले आहे. 

Gold-Silver Price Today : अशी संधी पुन्हा नाही! सोन्याच्या दरात मोठी घसरण, फटाफट चेक करा आजचे दर

बर्लुस्कोनीची मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी फॅसिना इटलीच्या कनिष्ठ सभागृहाची सदस्य देखील आहे. बर्लुस्कोनी यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या फोर्झा इटालिया या गटातही त्या सहभागी होत्या. बर्लुस्कोनीचे विशाल साम्राज्य सध्या त्यांची दोन मुले, मरीना आणि पियर सिल्व्हियो सांभाळत आहेत. दोघेही बराच काळ या व्यवसायाचा भाग आहेत. सध्या दोघांची बर्लुस्कोनीच्या व्यवसायात ५३ टक्के भागीदारी आहे. बर्लुस्कोनी यांनीही आपल्या अफाट संपत्तीतून १०० मिलियन युरो आपला भाऊ पाओलोला दिले आहेत.

तीन दशके इटालियन राजकारणावर वर्चस्व गाजवणारे बर्लुस्कोनी हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. राजकारणी असण्यासोबतच ते एक व्यापारी देखील होते. बर्लुस्कोनी यांचे १२ जून रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ल्युकेमिया चाचणीसाठी त्यांना मिलान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच त्याला जीव गमवावा लागला. बर्लुस्कोनी यांच्या वकिलाने त्यांच्या पाच मुलांच्या उपस्थितीत बर्लुस्कोनी यांचे मृत्यूपत्र वाचले. या मृत्युपत्रात बर्लुस्कोनी यांनी लिहिले की, 'मी उपलब्ध साठा माझ्या मुलांमध्ये समान प्रमाणात विभागत आहे. मी माझी सर्व संपत्ती मरीना, पियर सिल्व्हियो, बार्बरा, एलिओनोरा आणि लुइगी यांना दिले. या सर्व लोकांना समान हक्क मिळतील.

बर्लुस्कोनी हे तीनवेळा इटलीचे पंतप्रधान राहिले आहेत. टॅक्स फ्रॉडमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना राजकारणात बॅन करण्यात आले होते. 

Web Title: ex italian pm silvio berlusconi leaves 900 crore to 33 year old girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.