समुद्रकिनारच्या फेरफटक्याने मालामाल; मच्छीमारला सापडलं 'फ्लोटींग गोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:58 AM2023-10-16T09:58:58+5:302023-10-16T10:04:55+5:30

व्हेल माशाची उलटी हा मच्छीमारांमधील चर्चेचा विषय असतो.

Excursions to the beach; Fisherman found floating gold in scotland williamsan | समुद्रकिनारच्या फेरफटक्याने मालामाल; मच्छीमारला सापडलं 'फ्लोटींग गोल्ड'

समुद्रकिनारच्या फेरफटक्याने मालामाल; मच्छीमारला सापडलं 'फ्लोटींग गोल्ड'

कोणाचं नशिब कधी चमकेल हे सांगता येत नाही. एखाद्या गरिबाला लॉटरी लागली की त्याच्या जीवनात नक्कीच चमत्कार झाल्याचा विश्वास त्याला मिळतो. कधी लॉटरी लागली म्हणून तर अलिकडच्या काळात डिम ११ गेम्सवर टीम बनवल्यानेही काहीजण मालामाल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या व्यक्तीचं समुद्रकिनारी सापडलेल्या वस्तूमुळे भाग्यच उजळलं. पॅट्रिक विल्यमसन असं या व्यक्तीचं नाव असून समुद्रकिनारी कुत्र्याला फिरवत असताना त्याचं नशिबच चमकलं आहे.  

व्हेल माशाची उलटी हा मच्छीमारांमधील चर्चेचा विषय असतो. कारण व्हेल माशाची उलटी ही एखाद्या मच्छीमाराचं आयुष्यच बदलून टाकू शकते, इतक्या महागड्या किंमतीत ती विकली जाते. स्कॉटलँडमधील विल्यमसनलाही व्हेल माशाची उल्टीच आढळून आली आहे. समुद्रकिनारी त्याच्या कुत्र्याला व्हेलची उलटी आढळली, ज्यास एम्बरग्रीस असे म्हणतात. एम्बरग्रीस हे दिसायला दगडासारखे असते. कुत्र्यास फिरवण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या विल्यमसनला एम्बरग्रीसचा अत्यंत मौल्यवान तुकडा सापडल्याने तो आता मालामाल झाला आहे. त्याने मीडियाशी बोलातना आनंदही व्यक्त केला. या एम्बरग्रीसच्या तुकड्याचे वजन सुमारे ५.५ औंस एवढे आहे.

मी मासेमारीच्या बोटीवर काम करतो, त्यामुळे मला एम्बरग्रीस म्हणजे काय हे माहित होते. मी ते आधी कधीच पाहिले नव्हते, पण त्याबद्दल ऐकलं होतं, असे विल्यमसनने म्हटले. दरम्यान, ही मौल्यवान वस्तू सापडल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

एम्बरग्रीस म्हणजे फ्लोटिंग गोल्ड

नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या वेबसाइटनुसार, एम्बरग्रीसला 'समुद्राचा खजिना' आणि 'फ्लोटिंग गोल्ड' म्हटले जाते. स्पर्म व्हेल स्क्विड आणि कटलफिशसारखे समुद्री प्राणी खातात. यातील जे भाग पचू शकत नाही ते उलटी करुन बाहेर काढतात. हे भाग कधीकधी व्हेलच्या आतड्यांमध्ये अडकतात, वर्षांनुवर्षे ते व्हेलच्या आत असल्याने एम्बरग्रीस तयार होतो.
 

Web Title: Excursions to the beach; Fisherman found floating gold in scotland williamsan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.