आमूलाग्र आर्थिक बदलाची अपेक्षा अव्यवहार्य

By admin | Published: March 13, 2015 12:38 AM2015-03-13T00:38:00+5:302015-03-13T00:38:00+5:30

भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेच्या देशात अनेक नकाराधिकाराची केंद्रे असताना अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल घडण्याची अपेक्षा अवास्तव

Expectation of a radical economic change is impractical | आमूलाग्र आर्थिक बदलाची अपेक्षा अव्यवहार्य

आमूलाग्र आर्थिक बदलाची अपेक्षा अव्यवहार्य

Next

वॉशिंग्टन : भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेच्या देशात अनेक नकाराधिकाराची केंद्रे असताना अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल घडण्याची अपेक्षा अवास्तव असल्याचे स्पष्ट मत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.
मुख्य सल्लागारपदी गेल्या वर्षी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सुब्रमण्यम यांनी येथे पिटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठेच्या थिंक टँकमध्ये बोलताना वरील मत व्यक्त केले. भारताची अर्थव्यवस्था ही पुष्कळच सावरत असली तरी उसळी घेणारी नाही, असे ते म्हणाले.
सुब्रमण्यम म्हणाले की, गेल्या महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात फार मोठ्या सुधारणांच्या घोषणेची अपेक्षा करणे अव्यवहार्य होते. नवे सरकार महत्त्वाच्या धोरणांसह व आर्थिक सुधारणांसह हळूहळू का असेना; पण निश्चयाने पुढे जात आहे व हे प्रयत्न येत्या काळात भारताचा चेहरा बदलवतील. या अर्थसंकल्पाने सुधारणांची गती कायम राखली
आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात केंद्र, राज्य व वेगवेगळ्या संस्था या नकाराधिकारासारख्या असतात.

Web Title: Expectation of a radical economic change is impractical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.