नायजेरियात जागोजागी मृतदेहांचा खच
By Admin | Published: March 22, 2015 12:04 AM2015-03-22T00:04:05+5:302015-03-22T00:04:05+5:30
बोको हरामने नायजर आणि चॅडमधून पळ काढताना अनेकांची निर्घृण हत्या केली. या भागात दाखल झालेल्या सैनिकांना पावलोपावली मृतदेहांचे खच सापडले असून अनेकांचे गळे चिरण्यात आलेले आहेत
दमास्क : बोको हरामने नायजर आणि चॅडमधून पळ काढताना अनेकांची निर्घृण हत्या केली. या भागात दाखल झालेल्या सैनिकांना पावलोपावली मृतदेहांचे खच सापडले असून अनेकांचे गळे चिरण्यात आलेले आहेत. जवळपास ७० मृतदेह एका पुलाखाली सापडले.
सिमेंटच्या एका पुुलाखाली जागोजागी हे मृतदेह विखुरलेले होते. वाळंवटीय गरम आणि कोरड्या हवेने अनेक मृतदेह सुकले (ममी) आहेत. मृतदेहांच्या आजूबाजूला गवत उगले होते. त्यावरून हे हत्याकांड काही महिने आधी घडले असल्याचे दिसते.
लोकांची हत्या करण्यासाठीच इस्लामिक दहशतवाद्यांनी पुलाखालची जागा निवडली असावी, असे दिसते. गेल्या सहा वर्षांपासून बोको हराम हिंसाचार घडवीत आहे. बोको हरामच्या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे.
चॅडच्या एका सैनिकाने सांगितले की, गुरुवारी हे मृतदेह सापडले. कोरड्या नदीत कमीत कमी १०० मृतदेह सापडले. या परिसरात दुर्गंधी परसली आहे. या परिसरात आणखी मृतदेह गाडण्यात आले असावेत. पुलाच्या दोन्ही बाजूंवर रक्ताचे डाग पडले होते. हत्या केल्यानंतर मृतदेह पुलाखाली फेकण्यात येते होते, असे वाटते.
स्थानिक रहिवासी मुसा याने सांगितले की, बोको हरामने हल्ला केला तेव्हा आम्ही झुडपाकडे धाव घेतली. दहशतवादी गोळ्या झाडत होते. पाठलाग करून त्यांनी लोकांची हत्या केली. (वृत्तसंस्था)
४नायजेरियन लष्करासह चॅड, नायजेर आणि कॅमरुनच्या फौजांनी संयुक्तपणे इस्लामिक दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडत बोको हरामच्या ताब्यातील भाग ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे.
४२८ मार्च रोजी नायजेरियात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ईशान्य नायजेरियातील दहशतवादाचा बीमोड करण्यात अपयश आल्याने जोनाथन सरकारवर चौफेर टीका होत आहे.