महागड्या पेट्रोल-डिझेलवर पाकिस्तानात निघाला जबरदस्त तोडगा; उरलेले श्रीमंतही गरीब होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:54 PM2023-04-03T13:54:10+5:302023-04-03T13:54:51+5:30
दुसऱ्या देशांनी दिलेली मदत लुबाडण्यातच तिकडचे सरकारी अधिकारी धन्यता मानत आहेत. असे असताना पेट्रोल, डिझेल तरी कुठून विकत घेणार असा प्रश्न पाकिस्तानींसमोर उभा आहे.
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानकडे सध्या त्यांच्या जनतेचे एक वेळचे पोट भरण्यासाठी देखील पैसे नाहीएत. दुसऱ्या देशांनी दिलेली मदत लुबाडण्यातच तिकडचे सरकारी अधिकारी धन्यता मानत आहेत. असे असताना पेट्रोल, डिझेल तरी कुठून विकत घेणार असा प्रश्न पाकिस्तानींसमोर उभा आहे.
पाकिस्तानला रशिया गव्हाप्रमाणेच स्वस्तात कच्चे तेल पुरविणार आहे, असा दावा पाकिस्तानचे पेट्रोलिअम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी केला आहे. पुढील महिन्यात स्वस्त इंधनाचा पुरवठा होणार असून इस्लामाबादने मॉस्कोसोबत करार केला असल्याचे सांगितले आहे.
महागड्या पेट्रोल डिझेलवरही शाहबाज सरकारने तोडगा काढला आहे. सरकार लोकांना स्वस्तात इंधन उपलब्ध करेल असे मलिक यांनी म्हटले आहे. पाकिस्तान सध्या परकीय गंगाजळीशी झगडत आहे. यामुळे कमी दराने कच्चे तेल मिळते का ते आम्ही पाहत होतो. सरकारने यादृष्टीने काम केले आहे. आता पेट्रोल-डिझेलचे दर हे श्रीमंत आणि गरीबांसाठी वेगवेगळे असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. याचे दर ठरविले जातील आणि याचा फायदा गरीब लोकांना होईल असेही ते म्हणाले.
पाकिस्तान पेट्रोलियम विभाग बऱ्याच काळापासून रशियाकडून 50 डॉलर प्रति बॅरल दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता. रशियातून समुद्रमार्गे तेल येण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे.तेल कराराशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पेमेंटची पद्धत, शिपिंग खर्च आणि विमा खर्च यासारख्या अटी पूर्ण केल्या गेल्या आहेत.
रशिया एवढी मदत करत असूनही रशियाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान त्यांचे रणगाडे युक्रेनला पाठविणार आहे. ही बातमी वाचा...
युक्रेनने भारताविरोधात पाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविलेली; 44 टँक परत घेणार