रक्तरंजित थरार अनुभवला
By admin | Published: December 17, 2014 02:47 AM2014-12-17T02:47:28+5:302014-12-17T02:47:28+5:30
शिक्षक म्हणाले, जमिनीवर पडून राहा हल्ल्यातून बचावलेल्या एका विद्यार्थ्याने खासगी टीव्ही वाहिनीला सांगितले की, आम्ही परीक्षा हॉलमध्ये असताना अचानक गोळीबार
शिक्षक म्हणाले, जमिनीवर पडून राहा हल्ल्यातून बचावलेल्या एका विद्यार्थ्याने खासगी टीव्ही वाहिनीला सांगितले की, आम्ही परीक्षा हॉलमध्ये असताना अचानक गोळीबार सुरू झाल्याने आम्ही घाबरून गेलो. शांतपणे जमिनीवर पडून राहा, असे आमच्या शिक्षकांनी सांगितले. आम्ही तासभर जमिनीवर पडून होतो. तेवढा काळ जोरदार गोळीबार सुरू होता.
हल्लेखोर सहा किंवा सात होते. ते भिंतीवरून चढून आले तेव्हा मुुले खेळण्यासाठी चढली असावीत असे वाटले. त्यांच्याकडे खूप शस्त्रे होती. त्यांनी गोळीबार सुरू होताच आम्ही वर्गखोल्यांकडे धावलो. त्यावेळी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा समारंभ असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. प्रत्येक वर्गात जाऊन ते गोळ्या झाडत होते.
- मुदस्सर अवान :
प्रयोगशाळा सहायक
हल्ला मुलांच्या वर्गखोल्यांवर झाला. माझ्या मैत्रिणीची मुलगी वर्गापासून दूर होती. ती मोठे धाडस करून भावाला शोधत होती. ती ज्या खोलीत पोहोचली तेथे अंदाधुंद गोळ्या झाडल्या जात होत्या. तिचे कपडे रक्ताने माखून गेले होते. ती मेल्यासारखी पडून राहिली. हल्लेखोर निघून जाताच मागील दाराने ती पळून गेली.
- शिरीन, एक महिला
विद्यार्थ्यांना डोक्यात आणि छातीत गोळ्या घालण्यात आल्या. इतरांना आत्मघाती स्फोटाने उडविण्यात आले. - एक डॉक्टर