अपघात की हत्येचा कट…? पुतिन यांच्या 3 कोटींच्या कारमध्ये मोठा स्फोट! संपूर्ण रशियात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:19 IST2025-03-30T16:19:22+5:302025-03-30T16:19:48+5:30
putin limousine car explodes सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली.

अपघात की हत्येचा कट…? पुतिन यांच्या 3 कोटींच्या कारमध्ये मोठा स्फोट! संपूर्ण रशियात खळबळ
रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान लिमोझिन (Limousine) कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, काही वेळातच आलिशान कार आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारमध्ये मोठा स्फोट -
पुतिन यांच्या या आलिशान कारची किंमत £275,000 (सुमारे ३ कोटी रुपये) एवढी आहे. रशियन सुरक्षा एजन्सी एफएसबीच्या मुख्यालयासमोर हा स्फोट झाला.'द सन'च्या वृत्तानुसार, या स्फोटानंतर पुतिन यांनी, गटारांसह आपल्या सर्व रक्षकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्फोटावेळी गाडीत कोण-कोण उपस्थित होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली.
JUST IN: 🇷🇺 Luxury limousine from Russian President Putin's official motorcade exploded on the streets of Moscow, just blocks from the FSB headquarters.
— BRICS News (@BRICSinfo) March 29, 2025
It's unclear if this is an attempted ass*ssination attempt pic.twitter.com/Da4tcUoZEU
झेलेन्स्की यांनी केलीय पुतिन यांच्या मृत्यूची भविष्यवाणी -
तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या वक्तव्यानंतर, पुतिन यांच्या कारमध्ये ही स्फोटाची घटना घडली आहे. पुतिन यांची प्रकृती बरी नाही. ते लवकरच मरतील, असा दावा झेलेन्स्की यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. महत्वाचे व्लादिमीर पुतिन हे कडक सुरका व्यवस्थेत राहतात. तो नियमितपणे लिमोझिन कार वापरतात. 'द सन'च्या एका वृत्तानुसार, पुतिन यांना मृत्यूची भीती वाटते. त्यांचा स्वतःच्या कर्मचाऱ्यांवरही विश्वास नाही, असे त्यांच्या एका माजी अंगरक्षकाने म्हटले आहे.