रशियात मेट्रोमध्ये स्फोट, १० ठार, ५० जखमी
By admin | Published: April 4, 2017 06:26 AM2017-04-04T06:26:30+5:302017-04-04T06:26:30+5:30
रशियाच्या सेंट पीट्सबर्ग येथील मेट्रो रेल्वेत सोमवारी भीषण स्फोट होऊन १० ठार, तर ५० जण जखमी झाले.
सेंट पीट्सबर्ग : रशियाच्या सेंट पीट्सबर्ग येथील मेट्रो रेल्वेत सोमवारी भीषण स्फोट होऊन १० ठार, तर ५० जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शहराच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडली. हा स्फोट दहशतवादी हल्ला आहे की, त्यामागे वेगळे कारण आहे, याचा शोध तपासयंत्रणा घेत आहेत.
या घटनेनंतर राजधानी मॉस्कोतील मेट्रो रेल्वेची सुरक्षा वाढविली आहे. सेंट पीट्सबर्ग शहरातील बहुतांश रेल्वेस्थानके बंद करण्यात आली असून, प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. लोकांनी घटनास्थळाची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले. यात रेल्वेच्या डब्याचे तुटलेले दार आणि डब्याबाहेर जमिनीवर पडलेले लोक दिसतात. बाहेर कोणी आहे का, हे पाहण्यासाठी प्रवासी डब्यांचे दरवाजे आणि खिडक्यांजवळ पोहोचले. रुग्णवाहिका बोलवा, असे आवाहन ते करीत होते. (वृत्तसंस्था)