'नासा'च्या यानाचा उड्डाण होताच स्फोट
By Admin | Published: October 29, 2014 09:15 AM2014-10-29T09:15:55+5:302014-10-30T08:58:04+5:30
स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणा-या यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्याने नासाच्या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २९ - अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणा-या मानवरहित यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्याने नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. व्हर्जिना येथील प्रक्षेपण स्थळावर हा अपघात झाला असून उड्डाण घेताच अवघ्या काही मिनिटांत या यानाचा मोठ्ठा स्फोट झाला आणि ते खाक झाले.
सहा अंतराळवीरांसाठी सामुग्री घेऊन निघालेले हे यान १४ मजले उंच होते. या यानाच्या उड्डाणाची जबाबदारी ऑर्बिटल सायन्स या कंपनीकडे देण्यात आली होती, ज्यासाठी सदर कंपनीसोबत १.९ बिलीयन डॉलर्सचा करारही करण्यात आला होता.
यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे.