लंडनच्या भुयारी रेल्वेत स्फोटाप्रकरणी आता दुस-यालाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:56 AM2017-09-18T01:56:31+5:302017-09-18T01:56:37+5:30

लंडनच्या भुयारी रेल्वेत १५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी दुस-याही व्यक्तीला अटक केली. स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी शाखेने २१ वर्षांच्या व्यक्तीला शनिवारी रात्री पश्चिम लंडनमध्ये अटक केली.

Explosives in London's suburban railway | लंडनच्या भुयारी रेल्वेत स्फोटाप्रकरणी आता दुस-यालाही अटक

लंडनच्या भुयारी रेल्वेत स्फोटाप्रकरणी आता दुस-यालाही अटक

Next

लंडन : लंडनच्या भुयारी रेल्वेत १५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी दुस-याही व्यक्तीला अटक केली.
स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी शाखेने २१ वर्षांच्या व्यक्तीला शनिवारी रात्री पश्चिम लंडनमध्ये अटक केली. हा स्फोट आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला. शनिवारी डोव्हर भागातील पोर्टमध्ये १८ वर्षांच्या व्यक्तीला अटक झाली असून, त्या दोघांची नावे जाहीर केलेली नाहीत. ब्रिटनच्या दहशतवाद कायद्याखाली या दोघांना अटक झाली.

तत्पूर्वी सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले होते. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला होता.
हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले होते.
पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली होती.
 

Web Title: Explosives in London's suburban railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.