तीन वर्षांची चिमुकल्या शेरीनच्या मृत्युमुळे अमेरिकेत झाले दु:ख व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:37 AM2017-10-26T04:37:05+5:302017-10-26T04:37:13+5:30

ह्युस्टन : तीन वर्षांची चिमुकल्या शेरीनच्या मृत्युमुळे अमेरिकेतील रिचर्डसनवासी दु:खात आहेत. शेरीनला श्वास घेण्यास त्रास होत असताना नर्सला का उठविले नाही, असा सवाल करून, रिचर्डसनवासी तिच्या पालक पित्याविषयी संताप व्यक्त करीत आहेत.

Expressing grief in the US due to the death of a three-year-old Ms. Sherine | तीन वर्षांची चिमुकल्या शेरीनच्या मृत्युमुळे अमेरिकेत झाले दु:ख व्यक्त

तीन वर्षांची चिमुकल्या शेरीनच्या मृत्युमुळे अमेरिकेत झाले दु:ख व्यक्त

googlenewsNext

ह्युस्टन : तीन वर्षांची चिमुकल्या शेरीनच्या मृत्युमुळे अमेरिकेतील रिचर्डसनवासी दु:खात आहेत. शेरीनला श्वास घेण्यास त्रास होत असताना नर्सला का उठविले नाही, असा सवाल करून, रिचर्डसनवासी तिच्या पालक पित्याविषयी संताप व्यक्त करीत आहेत. शारीरिक विकासाच्या समस्या आणि नीट न बोलता येणारी शेरीन ७ आॅक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. अमेरिकी पोलिसांनी दोन आठवडे कसून तपास केल्यानंतर काल मंगळवारी शेरीनचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.
वेस्ली मॅथ्यूज व सिनी मॅथ्यू या दाम्पत्याने बिहारमधील नालंदा येथील एका अनाथाश्रमातून शेरीनला दत्तक घेतले होते. तिला घेऊन वेस्ली अमेरिकेला आले. शेरीनचे बेपत्ता होणे आणि त्यानंतर तिचा मृतदेह आढळणे यापर्यंतच्या घटनाक्रमाबाबत तिचे पालक पिता वेस्ली मॅथ्यूजने पोलिसांना जे काही सांगितले, त्यात कमालीची विसंगती आहे. दूध पित असताना तिच्या घशात दुधाचा घोट अडकल्याने तिचा श्वास कोंडला गेला. तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिचा मृतदेह घराबाहेर नेला, असे वेस्लीने आता पोलिसांना सांगितले होते.
त्या आधी ती दूध पीत नसल्याने मध्यरात्रीनंतर तिला घराबाहेर उभे केले आणि तिथून ती बेपत्ता आली, असे सांगितले होते. तथापि, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याचा संशय बळावल्याने रिचर्डसन पोलिसांनी वेस्लीला (३७) गंभीर गुन्ह्याखाली पुन्हा अटक केली. शेरीनचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या नाल्यात आढळल्यानंतर वेस्लीला अटक केली.
>शेरीनचा सांभाळ करण्यासाठी वेस्ली यांच्या पत्नी सिनी मॅथ्यूज यांनी नर्स नेमली होती. तिची वेळीच मदत घेतली असती, तर शेरीन आजही बागडताना दिसली असती. मुुलीच्या संगोपनात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ७ आॅक्टोबरच्या रात्री वेस्लीला अटक झाली होती. नंतर जामिनावर सोडण्यात आले. तो मूळ केरळचा आहे.

Web Title: Expressing grief in the US due to the death of a three-year-old Ms. Sherine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.