विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:11 AM2023-06-19T08:11:07+5:302023-06-19T08:14:55+5:30
कंपनी व्यवस्थापनाने, कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुसंवादी कुटुंब राखण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्याद्वारे कामावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
पूर्व चीनमधील झेजियांगस्थित कंपनीने कर्मचाऱ्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने “विवाहबाह्य संबंध प्रतिबंध आदेश” नावाने कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती नियमानुसार हा आदेश सर्व कर्मचाऱ्यांना जारी केला आहे आणि कंपनीच्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांना या अटींचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास नोकरीवरून काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
कंपनी व्यवस्थापनाने, कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुसंवादी कुटुंब राखण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्याद्वारे कामावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, सुसंवादी कौटुंबिक जीवन कामाच्या ठिकाणी उत्पादकता वाढवते. सर्व कर्मचारी योग्य मूल्ये बाळगतील आणि चांगले कर्मचारी बनण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
बंदी आणण्याचे उद्देश
- कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन बळकट करणे
- कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्याच्या कॉर्पोरेट संस्कृतीचा पुरस्कार करणे
- पती-पत्नीमधील प्रेम वाढवणे
- कुटुंबाचे अधिक चांगले संरक्षण करणे
- कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त करणे
विवाहितांना यांची बंदी
- विवाहबाह्य संबंध ठेवणे.
- प्रेमिका असणे.
- अनैतिक संबंध ठेवणे
- घटस्फोट