सिगारेटची पेटती थोटके रस्त्यावर फेकल्यास होणार जबर दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:45 AM2020-01-20T11:45:57+5:302020-01-20T11:46:37+5:30
भारतासह जगभरात वणवे लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे जंगल आणि प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग हे देखिल अशाच प्रकारच्या आगीचा परिणाम आहे.
भारतासह जगभरात वणवे लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे जंगल आणि प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग हे देखिल अशाच प्रकारच्या आगीचा परिणाम आहे. नैसर्गिक वणवा पेटल्यास एकवेळ ठीक पण मानवनिर्मित वणवा असेल तर. बऱ्याचदा सिगारेटची जळत असलेली थोटके, सिगारेट पेटविल्यानंतर माचिसचे काडे इतरत्र फेकले जाते. अशामुळेही वनसंपत्ती नष्ट होत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीमध्ये 50 कोटींहून अधिक प्राणी ठार झाले आहेत. तर जंगल परिसरात राहणारे शेकडो कुटुंब बेघर झाले आहेत. या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाचे जवानही आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळविले गेले असून पावसामुळे हे शक्य झाले आहेत. या भीषण घटनेमुळे ऑस्ट्रेलियन सरकारने वाहन चालकांसाठी नवा नियम बनविला आहे. वाहन चालवत असताना सिगारेटचे जळते थोटक बाहेर टाकल्यास तब्बल 11000 डॉलर म्हणजेच 5 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
एबीसी न्यूजनुसार हा नवा नियम ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये शुक्रवारपासून लागू केला जाणार आहे. यामध्ये कार चालकांसह प्रवाशांनाही दंड बसणार आहे. जर प्रवाशाने असे कृत्य केल्यास त्याला 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हा दंड टोटल फार बॅन क्षेत्रातच लागू असणार आहे. या क्षेत्रामध्ये उघड्यावर आग पेटविणेही दंडनिय असणार आहे.
ऑस्ट्रेलियातील लागलेल्या भीषण आगीतून पुन्हा वनसृष्टी निर्माण करण्यासाठी कदाचित 100 वर्षे लागण्याचा अंदाज आहे. पेटती थोटके टाकणाऱ्यांच्या वाहन परवान्यावर 10 पॉईंट घटविले जाणार आहे.