पाकमधील अतिरेकी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका - ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:35 AM2018-10-06T06:35:16+5:302018-10-06T06:35:53+5:30
पाकिस्तान आणि पश्चिम आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका आहे
वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि पश्चिम आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. येथील संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आखलेल्या नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये म्हटले.
इसिस, अल-कायदाप्रमाणेच अनेक दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू आहेत.
लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), तहरिक-इ-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) व पश्चिम आफ्रिकेत सक्रिय असलेल्या बोको हरामसारख्या संघटना स्थानिक सरकार, तसेच राजकीय पक्षांमध्ये आपली माणसे पेरतात व घातपाती कारवाया करतात. इसिसपासून अमेरिकेला सर्वात मोठा धोका आहे. इराक व सिरियामधील दहशतवादविरोधी लढ्यात इसिसचे हजारो दहशतवादी मारले गेल्याने, तिचा प्रभावही कमी झाला आहे.
अतिरेकी नेत्याची हत्या
इस्लामाबाद : सिपाह-ए-सहबा पाकिस्तान या बंदी घातलेल्या व आता अहले-सुन्नत-वल-जमात या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा नेता इस्माईल दरवेश व त्याच्या अंगरक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या घालून हत्या केली. पाकिस्तानातील पेशावर परिसरात ही घटना घडली.