नजरचुकीने बसले बंदुकीवर अन् लागली गुप्तांगाला गोळी
By admin | Published: July 5, 2017 08:05 PM2017-07-05T20:05:47+5:302017-07-05T22:05:59+5:30
सीटवर ठेवण्यात आलेल्या बंदुकीकडे लक्ष न देता सीटवर बसले असता बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यांच्या गुप्तांगाला गोळी चाटून गेली.
Next
>ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 05 - एखाद्याच्या नजरचुकीमुळे काय घडेल याचा काही नेम नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणा-या एका व्यक्तीला नजरचुकीमुळे त्याच्या गुप्तांगाला बंदुकीची गोळी छेदून गेल्याची घटना घडली.
38 वर्षीय केडरिक जेल्क्स असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपल्या गाडीत ड्रायव्हर सीटवर बंदुक ठेवली होती. त्यावेळी केडरिक जेल्क्स यांनी सीटवर ठेवण्यात आलेल्या बंदुकीकडे लक्ष न देता सीटवर बसले असता बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यांच्या गुप्तांगाला गोळी चाटून गेली. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांची सध्या प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. केडरिक जेल्क्स यांच्या शेजारी राहणा-या महिलेने पोलिसांना सांगितले की, बंदुकीची गोळी लागल्याच्या घटनेनंतर केडरिक जेल्क्स घरी आले आणि थेट बाथरुममध्ये शिरले. ही घटना घडली, त्यावेळी गाडीत केडरिक जेल्क्स एकटेच होते.
दरम्यान, एवढ्यावरच केडरिक जेल्क्स यांच्यावरील संकट टळले नाही. तर, पोलिसांना माहिती मिळाली आहे की, 2004 मध्ये ड्रग्जच्या आरोपाखाली केडरिक जेल्क्स यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच, या घटनेतून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर बंदुक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.