फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचे ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट झाले हॅक
By admin | Published: June 6, 2016 12:52 PM2016-06-06T12:52:42+5:302016-06-06T12:55:37+5:30
जगविख्यात सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'चा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरेबर्गचे ट्विटर व पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - जगविख्यात सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'चा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरेबर्गचे ट्विटर व पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक झाले आहे. 'अवरमाईन टीम'ने ही दोन्ही अकाऊंट्स हॅक केल्याची जबाबदारी स्वीकारली असून 'ट्विटर' व 'पिंट्रेस्ट' या दोन्ही सोशल साईट्सवरील लाखो अकाऊंट्स धोकादायक स्थितीत असल्याचे दाखवून देण्यासाठीच आपण झुकेरबर्गचे अकाऊंट हॅक केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
- तसेच या टीमने झुकेरबर्गचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे, मात्र ते अकाऊंट हॅक झालेले नाही. झुकेरबर्गचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यावर ट्विटर व्यवस्थापनाकडून तत्काळ 'अवरमाईन टीम'चे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे समजते.