फेसबुकने बंद केली ५८ कोटी बनावट खाती, ८४ कोटी स्पॅम पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:09 AM2018-05-17T05:09:19+5:302018-05-17T05:09:19+5:30

केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने डेटाचोरी करून, तिचा गैरवापर फेसबुकने साफसफाई मोहीम हाती घेतली असून त्यानुसार तीन महिन्यांत ५८.३ कोटी बनावट खाती बंद केली आहेत.

Facebook closes 58 million fake accounts, 84 million spam posts | फेसबुकने बंद केली ५८ कोटी बनावट खाती, ८४ कोटी स्पॅम पोस्ट

फेसबुकने बंद केली ५८ कोटी बनावट खाती, ८४ कोटी स्पॅम पोस्ट

Next

पॅरिस : केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने डेटाचोरी करून, तिचा गैरवापर फेसबुकने साफसफाई मोहीम हाती घेतली असून त्यानुसार तीन महिन्यांत ५८.३ कोटी बनावट खाती बंद केली आहेत. तसेच लैैंगिकता व हिंसकतेला उत्तेजन, प्रोत्साहन तसेच दहशतवाद व विद्वेषी भावना यांचा प्रसार करणाऱ्या काही कोटी पोस्टविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईनंतरही फेसबुकवरील बनावट खात्यांपैैकी तीन ते चार टक्के खाती सुरूच असून, तीही आता बंद केली जातील. फेसबुकने ८३.७ कोटी स्पॅम पोस्ट काढून टाकल्या आहेत.
लंैगिकता, हिंसकतेला प्रोत्साहन देणाºया तसेच विद्वेष पसरविणाºया व सुमारे ३ कोटी पोस्टच्या विरोधात फेसबुकने कारवाई सुरू केली आहे. त्यातील अनेक पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत किंवा त्या समाजासाठी विघातक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ३४ लाख पोस्टमध्ये ग्राफिकच्या माध्यमातून हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यात आल्याचे फेसबुकने कृत्रिम विद्वत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढले आहे. (वृत्तसंस्था)
>२०० अ‍ॅपचा वापर स्थगित
माहितीचा गैरवापर केल्याचा संशय असलेल्या
२०० अ‍ॅपचा वापर फेसबुकने थांबवलाआहे. या अ‍ॅपच्या कारभाराची चौकशी फेसबुक करीत आहे. फेसबुकची साफसफाई करू आणि विघातक गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल असे या कंपनीचे सीइओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केले होते.

Web Title: Facebook closes 58 million fake accounts, 84 million spam posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.