कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:28 PM2020-05-22T15:28:47+5:302020-05-22T15:31:40+5:30
फेसबुक पोर्टलँड, सॅनडियागो येथील कार्यालयांमध्ये अन्य कर्मचारी वर्गाचीही भरती करणार आहे. सध्या या योजनेची त्यांनी माहिती दिलेली नाही.
सोशल मीडिया कंपनी फेसबुकने एक भन्नाट आणि महत्वाची घोषणा केली आहे. लॉकडाऊन लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पुढील ५ ते १० वर्षे घरातूनच कार्यालयीन काम करू शकणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. याचबरोबर मार्क झकरबर्गने वर्क फ्रॉम होम पॉलिसीचे समर्थनही केले आहे.
लॉकडाऊन संरपल्यानंतर सुरुवातीला केवळ २५ टक्केच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. याचसोबत ज्यांना घरातून काम करायचे आहे, त्यांना जानेवारी २०२१ आधी त्यांचे लोकेशन द्यावे लागणार आहे. या काळात फेसबुक १०००० नवीन इंजिनिअर भरती करणार आहे. याशिवाय कंपनी अटलांटा, डग्लस आणि डेन्वरमध्ये नवीन हबही उभारणार आहे. यामध्ये अधिकाधिक इंजिनिअरना नोकरी दिली जाणार आहे.
फेसबुक पोर्टलँड, सॅनडियागो येथील कार्यालयांमध्ये अन्य कर्मचारी वर्गाचीही भरती करणार आहे. सध्या या योजनेची त्यांनी माहिती दिलेली नाही.
ट्विटरही उत्सुक
फेसबुकआधी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनेदेखील कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची योजना जाहीर केली होती. सध्याची परिस्थिती पाहता आपले कर्मचारी त्यांना वाटेल तेवढे दिवस घरून काम करू शकतात. परिस्थिती सुधरली तरीहीदेखील त्यांना परवानगी दिली जाईल, असे म्हटले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या....
पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका
कोरोनाच्या संकटात 5G ची पेरणी; Oppo Find X2 Neo स्मार्टफोन लाँच
देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज
CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत
कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र