फेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, सावधान!
By admin | Published: July 7, 2015 11:16 PM2015-07-07T23:16:48+5:302015-07-07T23:16:48+5:30
फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळे वैतागला असाल व अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर सावधान!
न्यूयॉर्क : फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळे वैतागला असाल व अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर सावधान! कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केले त्याला ते कळत नसे; पण आता तसे नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मेसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळे ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचे लक्षात ठेवावे लागेल.
‘हू अनलिस्टेड मी आॅन फेसबुक’ नावाचे एक नवे अॅप बाजारात आले असून, या अॅपमुळे ज्यांचे नाव अनफ्रेंड झाले, त्याला तात्काळ मेसेज जाणार आहे. उठता, बसता अन् बिनकामाचे पोस्ट टाकण्याची सवय अनेक मित्रांना असते. आतापर्यंत अशा मित्रांना अनफ्रेंड केलेले कळत नसे; पण आता तसे नाही. या आयएसओ बेस्ड अॅपमुळे आपण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या अॅपच्या साहाय्याने एखाद्या मित्राने फेसबुक अकाऊंट बंद केले किंवा अकाऊंट बंद असलेला मित्र पुन्हा परतला तरीही त्याची माहिती हे अॅप देणार आहे. ही सुविधा फेसबुकची नाही, अॅप स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार आहे.(वृत्तसंस्था)