फेसबुकवर दर तासाला अपलोड होतात १० कोटी फोटो

By admin | Published: July 19, 2015 12:05 PM2015-07-19T12:05:33+5:302015-07-19T12:08:59+5:30

सोशल नेटवर्किंग साईट्सची लोकप्रियता दिवसेगणिक वाढत असून फेसबुकवर दर तासाला जगभरातून तब्बल १० कोटी फोटोज अपलोड होतात अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Facebook uploads 100 million photos every hour | फेसबुकवर दर तासाला अपलोड होतात १० कोटी फोटो

फेसबुकवर दर तासाला अपलोड होतात १० कोटी फोटो

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १९ - सोशल नेटवर्किंग साईट्सची लोकप्रियता दिवसेगणिक वाढत असून फेसबुकवर दर तासाला जगभरातून तब्बल १० कोटी फोटोज अपलोड होतात अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. जगभरातील इंटरनेट युजर्सची संख्या २०१५ च्या अखेरीस ३.२ अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून यातील २ अब्ज युजर्स हे विकसनशील देशातील असतील असे भाकितही या सर्वेक्षणात वर्तवण्यात येत आहे. 
 
इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेश युनियन या जागतिक संस्थेने इंटरनेट युजर्स व इंटरनेटवरील घडामोडी याविषयी एक आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये फेसबुकवर दरतासा १० कोटी फोटोज तर युट्यूब प्रत्येक सेकंदाला एका तासाच्या कालावधीचा एक व्हिडीओ अपलोड होत असल्याचे म्हटले आहे. तसेच गुगलवर दररोज १० लाख गीगाबाईट डाटाची प्रोसेसिंग होते. २०१५ च्या अखेरीस विकसनशील देशांमध्ये ३४ टक्के घरांमध्ये इंटरनेट असेल असून आशियातील ५ पैकी २ व्यक्ती इंटरनेट युजर्स असतील असेही या अहवालात म्हटले आहे. डाटा प्रोसोसिंग व स्टोरेजमधील खर्चात होणारी घट यामुळे इंटरनेटचा वापर दिवसेगणिक वाढत असल्याचे निरीक्षणही यामध्ये नोंदवण्यात आले आहे. एकीकडे इंटरनेटचा वापर वाढत असला तरी यामुळे व्यक्तिगत माहिती सार्वजनिक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून ग्राहकांनी इंटरनेट वापरताना सतर्कत बाळगावी असे आवाहन संस्थेने केले आहे. 

Web Title: Facebook uploads 100 million photos every hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.