पुन्हा होऊ शकतो तुमचा डेटा लीक, फेसबुकने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 07:35 AM2018-04-28T07:35:24+5:302018-04-28T07:35:24+5:30
भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे.
सॅनफ्रान्सिस्को- भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ही प्रकरणं कंपनीच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवू शकतात. फेसबुकने अमेरिकेच्या सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पण या मध्ये कॅब्रिज अॅनालिटीकाचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही.
युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व माहितीची पडताळणी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते आहे. डेटाचा चुकीचा वापर थांबविण्यासाठी याचा फायदा होईल, असं कंपनीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.फेसबुकनुसार, मीडिया आणि थर्ड पार्टीकडून घटना आणि संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.
डेटा लिकसारख्य आणखीही घटना समोर येऊ शकतात, असा इशारा फेसबुकने गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीच्या धोरणांविरोधात डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. निवडणुकीसाठीची कॅम्पेन, जाहिराती आणि चुकीच्या सूचना पसरविण्यासाठी डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
डेटा लीकसारखी घटना पुन्हा घडली तर युजर्सचा कंपनीवरील विश्वास कमी होईल तसंच ब्रॅण्ड इमेजवरही फरक पडेल परिणासी व्यावसायावर याचा परिणाम होइल. डेटाचा चुकीचा वापर केल्यामुळे आपल्या पुढील कारदेशीर गोष्टीही वाढत जातील त्यामुळे दंड भरायला लागल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.
दरम्यान, फेसबुकचे सर्वेसर्वा झुकर्सबर्ग यांचाही डेटा चोरी झाल्याचं समोल आलं आहे. अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की, ज्या युजर्सचा डेटा चुकीच्यापद्दतीने ब्रिटिश पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्मबरोबर शेअर केला त्यामध्ये माझंही नाव होतं, असं ते म्हणाले.