फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 09:54 AM2021-03-02T09:54:48+5:302021-03-02T09:55:14+5:30

फेशियल रेकग्निशनच्या माध्यमातून माहिती गोळा केल्यानं गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग; नुकसान भरपाई द्यावी लागणार

facebook will give 4783 crores compensation | फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

Next

सॅन फ्रान्सिस्को: मोबाईलमधील फेस रेकग्निशन फीचर्सचा वापर करून वापरकर्त्यांची माहिती गोळा करणाऱ्या फेसबुकला जोरदार दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं फेसबुकला तब्बल ४ हजार ७८३ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. फेसबुकनं फेशियल रेकग्निशन तंत्राच्या माध्यमातून फोटो टॅग करण्याचं फीचर दिलं होतं. 

तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी

फेशियल रेकग्निशन तंत्राच्या माध्यमातून नवं फीचर देताना कंपनीनं वापरकर्त्यांची माहिती गोळा केली. यामुळे गोपनीयतेचं उल्लंघन झाल्याचा दावा करत डिसेंबरपर्यंत १५ लाख ७१ हजार ६०८ फेसबुक वापरकर्त्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सामूहिक सुनावणी झाली. फेसबुकनं तक्रारदारांना भरपाई देण्याचा आदेश सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानं दिला. 

तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ता

फेसबुकनं बायोमेट्रिक माहिती गोपनीयता कायद्याचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं. या प्रकरणी तिघांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी होती. अखेर न्यायालयानं फेसबुकला भरपाई देण्याचे आदेश दिले. फेसबुकला तक्रारदारांना ४ हजार ७८३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. गोपनीयतेचं उल्लंघन म्हणून आतापर्यंत कोणत्याही कंपनीला इतकी मोठी भरपाई द्यावी लागलेली नाही. त्यामुळे हा खटला ऐतिहासिक ठरला.

सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानं दिलेला निकाल फेसबुकसाठी मोठा दणका मानला जात आहे. न्यायालयाच्या निकालानं तक्रारदारांचा मोठा विजय झाला आहे. आता प्रत्येक वापरकर्त्याला ३४५ डॉलर म्हणजेच २५ हजार ३९० रुपयांची भरपाई मिळेल. २०१५ पासून या खटल्याची सुरुवात झाली. हळूहळू फेसबुक विरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. २०२० पर्यंत फेसबुकनं ४ हजार ४७ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण न्यायाधीशांनी हस्तक्षेप केल्यानं ही रक्कम वाढवण्यात आली.

Web Title: facebook will give 4783 crores compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.